या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार कोणीतरी दुसराच असल्याचे दिल्ली पोलिसांचे मत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. संसद भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित आठ जणांना निलंबित करण्यात आले आहे.Eight persons related to security personnel suspended in Parliament security breach case
निलंबित करण्यात आलेल्या संसदेच्या 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नावे रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र असल्याची माहिती समोर आली आहे.
संसद भवनात मोठ्या प्रमाणात सुरक्षा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांवर दहशतवाद विरोधी कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
संसद भवनात घुसखोरी करणाऱ्या तरूणांनी बुटामध्ये लपवून स्मोक कँडल आणल्या होत्या. फवारणी होताच सभागृहात पिवळा धूर पसरू लागला. यानंतर खासदारांनी त्या तरुणांना पकडून बेदम चोप दिला.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार कोणीतरी दुसराच असल्याचे दिल्ली पोलिसांचे मत आहे. म्हणजेच जे चार जण पकडले गेले आहेत आणि ललित झा फरार आहेत. या पाच जणांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जो या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार आहे.
संसद भवनात मोठ्या प्रमाणात सुरक्षा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांवर दहशतवाद विरोधी कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
Eight persons related to security personnel suspended in Parliament security breach case
महत्वाच्या बातम्या
- संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!
- मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!
- धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेनंतर आता घरातील सोन्याचा शोध घेण सुरू
- संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!