• Download App
    अभिमानास्पद! टाइम मॅग्झिनच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आठ भारतीय Eight Indians in Time magazine's list of 100 most influential people in the world

    अभिमानास्पद! टाइम मॅग्झिनच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आठ भारतीय

    जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा आणि ओला इलेक्ट्रिकचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल यांचाही समावेश

    विशेष प्रतिनधी

    नवी दिल्ली : हवामान क्षेत्रातील योगदानासाठी टाइम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आठ भारतीय आणि भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. यामध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा आणि ओला इलेक्ट्रिकचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल यांचाही समावेश आहे. Eight Indians in Time magazine’s list of 100 most influential people in the world

    ‘टाइम 100 क्लायमेट’ यादीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), संस्थापक, समाजसेवी, संगीतकार, धोरणकर्ते आणि जगभरातील सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेपूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

    बंगा आणि अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त या यादीत रॉकफेलर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव जे शाह, बोस्टन कॉमन अॅसेट मॅनेजमेंटच्या संस्थापक आणि अध्यक्षा गीता अय्यर, यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी लोन प्रोग्राम ऑफिसचे संचालक जिगर शाह, हस्क पॉवर सिस्टमचे CEO आणि सह-संस्थापक मनोज सिन्हा, कैसर पर्मनेन्टेचे पर्यावरण व्यवस्थापन कार्यकारी संचालक सीमा वाधवा आणि महिंद्रा लाइफस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO अमित कुमार सिन्हा यांचा समावेश आहे.

    Eight Indians in Time magazine’s list of 100 most influential people in the world

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!