• Download App
    काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण Effective countering of terrorists in Kashmir; Weapons training to villagers

    काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू – काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सीआरपीएफ ग्राम विकास समितीच्या अंतर्गत गावकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे.Effective countering of terrorists in Kashmir; Weapons training to villagers

    गेल्या काही दिवसात पुँछ आणि राजौरीमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजौरी जिल्ह्यातील धनगरीमध्ये प्रत्येक ग्रामरक्षा समितीतील एखाद्या सदस्याला SLR रायफल देण्यात येणार आहे. तर काही ग्राम रक्षा समित्यांमध्ये दोन ते तीन सदस्यांना स्वयंचलित रायफल्स देण्यात येणार आहेत.


    Jammu Kashmir: काश्मिरात उरीसारखा मोठा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला, लष्कराच्या छावणीत घुसलेले 2 दहशतवादी ठार, 3 जवान शहीद


    ३०३ शस्त्रास्त्रांचे वाटप 

    राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात सोमवारी, ९ जानेवारी रोजी एक विशेष शिबीर राबवण्यात आले, यात जवळपास १०० सदस्यांना शस्त्र देण्यात आली. यात ४० माजी सैनिकांचा समावेश आहे. ज्यांना एसएलआर रायफल देण्यात आली आहे.

    पोलिसांच्या शिबीरात ६० स्थानिक लोकांना देखील बंदुक देण्यात आली. आतापर्यंत एकूण ३०३ शस्त्रांचे वाटप करण्यात आले. ४० माजी सैनिकांना सेल्फ-लोडिंग रायफल देण्यात आल्या आहेत. त्यातून दहशतवाद्यांना तात्काळ उत्तर देता येईल.

    Effective countering of terrorists in Kashmir; Weapons training to villagers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींचा कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे‌ Political Icons संपले??

    IndiGo : इंडिगोची आंतरराष्ट्रीय विमानसेवा ₹2300 पर्यंत महागली; घरगुती विमानांच्या तिकिटांवर ₹425 वाढतील

    LPG Booking Gap : गावांमध्ये 45 दिवसांनंतर दुसरा घरगुती LPG सिलिंडर; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने 20 दिवसांची मुदत वाढवली