• Download App
    जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे  मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 'ईडी'चे पाचवे समन्स! EDs fifth summons to Jharkhand Chief Minister Hemant Soren in case of land scam

    जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे  मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ‘ईडी’चे पाचवे समन्स!

    या जमीन घोटाळ्याप्रकरणी  ईडीने आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    झारखंड : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोरेन यांना पाचवे समन्स बजावले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्र्यांना ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले आहे. EDs fifth summons to Jharkhand Chief Minister Hemant Soren in case of land scam

    विविध कारणे सांगून हेमंत चार समन्स बजावूनही ईडीच्या कार्यालयात पोहोचले नाही. त्यानंतर ईडीने पाचवे समन्स जारी केले आहे. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी हेमंत सोरेन यांनी ईडीला पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी समन्स रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेवर झारखंड उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत समन्सला स्थगिती देण्याची विनंती केली होती.

    यापूर्वी, जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौथे समन्स पाठवले असता, चौकशीसाठी हजर न राहता त्यांनी त्यांच्या सचिवालयातील एका कर्मचाऱ्याला ईडी कार्यालयात पाठवले. ते सचिवालय कर्मचारी एक पत्र घेऊन ईडी कार्यालयात पोहोचले ज्यात हेमंत सोरेन यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे हजर राहण्यासाठी आणखी काही वेळ मागितला होता.

    या जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांना समन्स पाठवण्यापूर्वी ईडीने आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक केली आहे. यामध्ये रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन, कोलकाता व्यापारी अमित अग्रवाल, न्यूक्लियस मॉलचे मालक विष्णू अग्रवाल यांसारख्या लोकांची नावे आहेत.

    EDs fifth summons to Jharkhand Chief Minister Hemant Soren in case of land scam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका