वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सरकारने बुधवारी रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी केले. अशा स्थितीत आगामी काळात खाद्यतेलाच्या दरात घसरण पाहायला मिळू शकते. भारत प्रामुख्याने अर्जेंटिना, ब्राझील, युक्रेन आणि रशियामधून सोया तेल आणि सूर्यफूल तेल आयात करतो.Edible oil likely to become cheaper soon, government cuts import duty on oil by 5 percent
भारत हा वनस्पती तेलांचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि आपल्या मागणीपैकी 60% आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीतील चढउतारांचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो. एकूण आयातीबद्दल बोलायचे झाल्यास, भारत दरवर्षी 14 MT तेल आयात करतो. यामध्ये कच्च्या तेलाचा आणि शुद्ध तेलाचा वाटा 75% आणि 25% आहे. वार्षिक वापर 24 MT आहे.
तेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी पावले
तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (SEA) कार्यकारी संचालक बीव्ही मेहता यांनी सांगितले. SEA डेटा दर्शवितो की, चालू तेल वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (नोव्हेंबर-ऑक्टोबर) सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची शिपमेंट 3.1MT पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी ते 3.3 MT इतकी होती.
सरकारने प्रतिलिटर 8 ते 12 रुपयांनी दर कमी करण्यास सांगितले
या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने खाद्यतेल असोसिएशनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीत घसरण लक्षात घेऊन तेलाच्या किमती 8-12 रुपयांनी कमी करण्यास सांगितले होते. या महिन्याच्या सुरुवातीला खाद्यतेल असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीनंतर अन्नमंत्र्यांनी सांगितले होते की, काही कंपन्यांनी, ज्यांनी किमती कमी केल्या नाहीत त्यांना किमती कमी कराव्या लागतील.
रिफाइंड सोया तेलाची किंमत 90,000 रुपये प्रति टन
एप्रिलमध्ये भारतातील सोयाबीन तेलाची आयात 1% वाढून 262,000 टन झाली आणि सूर्यफूल तेलाची आयात 68% वाढून 249,000 टन झाली. रिफाइंड सोया तेलाची किंमत प्रति टन 90,000 रुपये आणि सूर्यफूल तेलाची किंमत 92,000 रुपये प्रति टन होती.
Edible oil likely to become cheaper soon, government cuts import duty on oil by 5 percent
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींसाठी डिनर होस्ट करणार बायडेन फॅमिली; पंतप्रधान 21 जून रोजी बायडेन-जिल यांचे पाहुणे असतील, दुसऱ्या दिवशी स्टेट डिनर
- अंतराळातून कसे दिसले बिपरजॉय चक्रीवादळ? सौदीच्या अंतराळवीराने टिपली भयंकर दृश्ये
- उत्तर प्रदेश : दारुल उलूम देवबंदने विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यावर घातली बंदी!
- अहमदाबादमध्ये लँडिंग दरम्यान इंडिगो फ्लाइटला ‘टेल स्ट्राइक’चा फटका