एक हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
विशेष प्रतिनिधी
रांची: झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) टीम मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या रांची येथील निवासस्थानी पोहोचली आहे. रांचीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितले की, एक हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.ED team reached Hemant Sorens house for investigation in money laundering case
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रांची प्रशासनाने तपास यंत्रणेचे कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील वाहतुकीवर निर्बंध राहणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाने 13 जानेवारीला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी उपलब्ध राहण्यास सांगितले होते. उत्तरात, सोरेन यांनी ईडीला सांगितले की ते 20 जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी त्यांचा जबाब नोंदवू शकतात.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि अनेक आदिवासी संघटनांच्या निदर्शनांदरम्यान, तपास यंत्रणेने मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक, रांची यांना पत्र लिहून सुरक्षा आणि कायदा सुनिश्चित करण्यास सांगितले होते.