वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आत्तापर्यंत कोर्टातल्या बातम्यांमध्ये तारीख पे तारीख ऐकू यायचे पण आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या देखील तारीख पे तारीख बाता सुरू झाल्या आहेत. राहुल गांधींना ईडीने नव्याने समन्स जारी केले आहे. ED summons rahul Gandhi on 13 – 14 june
नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा नव्याने समन्स बजावले आहे. आता त्यांना 13 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीने त्यांना 13 – 14 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने यापूर्वी त्यांना 2 जून रोजी बोलावले होते, मात्र ते सध्या परदेशात असल्याने त्यांना चौकशीला हजर राहता आले नव्हते. यानंतर राहुल गांधींनी ईडीला पत्र लिहून विनंती करत चौकशीसाठी नवीन तारीख मागितली होती. राहुल गांधी सध्या परदेशात आहे एक ते पाच जूनला भारतात परतणार असल्याचे आधी बातमी होती परंतु आता त्यांनी देखील आपली भारतात परत येण्याची तारीख वाढवली असून ते 10 जूनला भारतात येणार असल्याची बातमी आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही चौकशी होणार आहे. त्यांना ईडीने 8 जून रोजी बोलावले आहे. मात्र, सोनिया गांधी यांना गुरूवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असे सांगितले जाते की, जर सोनिया बऱ्या झाल्या तर त्या नक्कीच चौकशीला उपस्थित राहतील. दरम्यान, सोनिया गांधींनंतर आता शुक्रवारी प्रियांका गांधींनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
– काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
नॅशनल हेराल्डचा मुद्दा 2012 मध्ये चर्चेत आला. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड हे यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामींनी केला होता. या कारस्थानाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.
ED summons rahul Gandhi on 13 – 14 june+
महत्वाच्या बातम्या
- नेहरू / मोदी : मुघल ए आझम “पृथ्वीराजला” मेजवान्या चालतील; पण या “पृथ्वीराज”चे प्रमोशन चालणार नाही!!
- 100 कोटींची वसुली : अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र दाखल; सचिन वाझे माफीचा साक्षीदार!!
- काश्मिरी पंडित टार्गेटेड किलिंग : सिनेमांच्या प्रमोशन मधून सरकारला वेळ कुठेय?; राहुल गांधी, ओवैसींनी मोदी सरकारला घेरले!!
- वादग्रस्त PFI आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनवर ईडीची धडक कारवाई, 33 बँक खाती गोठवली