हरकसिंग राव यांच्या सूनेलाही समन्स बजावले आहे.
विशेष प्रतिनिधी
डेहराडून: काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मंत्री हरकसिंग रावत आणि त्यांच्या सुनेला EDने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. शुक्रवारी याबाबत माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, रावत यांना 29 फेब्रुवारीला डेहराडूनमधील फेडरल एजन्सीसमोर आणि 7 मार्च रोजी त्यांची सून अनुकृती यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले आहे.ED summons former Uttarakhand minister Hark Singh Rawat in money laundering case
एजन्सीने 7 फेब्रुवारी रोजी रावत आणि इतरांच्या जागेची झडती घेतली होती. झडतीदरम्यान सुमारे 1.20 कोटी रुपयांचे भारतीय आणि विदेशी चलन, सोने आणि मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
रावत यांचे निकटवर्तीय बिरेंद्र सिंग कंडारी, भारतीय वन सेवेचे अधिकारी आणि माजी विभागीय वन अधिकारी (डीएफओ) किशन चंद आणि माजी वन परिक्षेत्र अधिकारी ब्रिज बिहारी शर्मा यांच्याविरुद्ध ईडी चौकशी करत आहे. रावत हे राज्याचे माजी वनमंत्री आहेत आणि 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ईडीच्या म्हणण्यानुसार, या लोकांविरुद्धचा तपास राज्यात दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या एफआयआरमधून झाला आहे.
ED summons former Uttarakhand minister Hark Singh Rawat in money laundering case
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटीशर्ती!!
- RBIने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली
- संदेशखळीत संतप्त लोकांनी शहाजहान शेख यांच्या जागांची केली तोडफोड
- बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनेक राज्यांमध्ये EDची छापेमारी!