वृत्तसंस्था
रांची : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी नोटीस दिली आहे. ईडीने 27 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान चौकशीसाठी कार्यालयात येण्यास सांगितले आहे. 20 जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कथित जमीन घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री सोरेन यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुमारे आठ तास चौकशी केली होती. झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष सोरेन यांनी दावा केला होता की, हे आपल्याविरुद्धचे षड्यंत्र आहे.ED sent a notice to Jharkhand Chief Minister Hemant Soren, calling for a second round of enquiry
सीएम सोरेन यांची चौकशी सुरू असताना मोठ्या संख्येने सुरक्षा दलाच्या तैनातीमुळे संपूर्ण परिसर बालेकिल्ल्यात बदलला होता. यापूर्वी, ईडीने सात वेळा समन्स बजावल्यानंतर मुख्यमंत्री चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर झाले नव्हते. ईडीने त्यांना आठव्यांदा समन्स बजावल्यानंतर अखेर त्यांनी संमती दिली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, हा तपास झारखंडमधील माफियांकडून जमिनीच्या मालकीमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या एका मोठ्या टोळीशी संबंधित आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात 2011च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे, ज्यांनी राज्य समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीचे उपायुक्त म्हणून काम केले होते.
चौकशी केल्यानंतर सीएम सोरेन आपल्या समर्थकांना म्हणाले होते की, “माझ्या विरोधात कट रचला गेला आहे, परंतु आम्ही कटकारस्थानाच्या शवपेटीमध्ये शेवटचा खिळा ठोकू… आम्ही घाबरणार नाही, तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे… हेमंत सोरेन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की त्यांना वाटत असेल की एखादा गाजर किंवा मुळा. सहज उपटून टाकता येईल, पण हा असा प्रकार नाही.
राज्याच्या 81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीकडे 47 आमदार आहेत, ज्यात JMM चे 29, कॉंग्रेसचे 17 आणि राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) चे प्रत्येकी एक आमदार आहे.
ED sent a notice to Jharkhand Chief Minister Hemant Soren, calling for a second round of enquiry
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 7.2 तीव्रता, चीन-नेपाळ सीमेवर होते केंद्र
- कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली; मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना
- बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न मोदींकडून साकार; बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेची भव्य शोभायात्रा!!
- “पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान माणूस”: शिल्पकार अरुण योगीराज यांची भावना!