वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गुरुवारी आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या घरी पोहोचले आहे.ED raids another AAP minister Rajkumar Anand’s house ahead of CM Kejriwal’s interrogation
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांच्या सिव्हिल लाईन्स भागातील निवासस्थानावर ईडीची छापा टाकण्यात येत आहे. आज सकाळपासून ईडीची टीम शोध घेत आहे. त्यांच्याशी निगडीत एकूण 9 जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची ही कारवाई सुरू आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दारू धोरणाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी, केंद्रीय तपास यंत्रणेने एप्रिलमध्येही आप प्रमुखांची चौकशी केली होती. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह हे आधीच चौकशीचा सामना करत असून ते तुरुंगात आहेत. या कारवाईवरून ‘आप’ने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
पक्षाचे म्हणणे आहे की भाजप विरोधी नेत्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे केजरीवाल यांना चौकशीनंतर अटक केली जाऊ शकते. केजरीवाल यांच्यानंतर हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, पिनाराई विजयन, एमके स्टॅलिन यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे आप खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटले होते.
ED raids another AAP minister Rajkumar Anand’s house ahead of CM Kejriwal’s interrogation
महत्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई
- बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता
- श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!
- क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!