वृत्तसंस्था
लखनऊ : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने नोटीस पाठवली आहे. गौरी खान ही लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांना अंदाजे 30 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. गौरी खानही या कंपनीच्या चाकोरीत येत आहे. ED notice to actor Shahrukh’s wife Gauri; Brand Ambassador of Tulsiani Group
गौरी खानला 2015 मध्ये तुलसियानी ग्रुपने ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील एक फ्लॅट मुंबईतील रहिवासी किरीट जसवंत शहा यांनी 2015 मध्ये 85 लाख रुपयांना खरेदी केला होता.
किरीट जसवंत शहा यांनी आरोप केला आहे की, कंपनीने त्यांना ना ताबा दिला, ना पैसे परत केले. यानंतर जसवंत शाह यांनी तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
गौरी खानला पाठवलेल्या नोटीसमध्ये ईडीच्या लखनौ शाखेने तिला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी तुलसियानी ग्रुपने किती पैसे दिले आणि हे पैसे तिला कसे देण्यात आले याची विचारणा केली आहे. त्यासाठी कोणते करार करण्यात आले असून या कराराचे कागदही अंमलबजावणी संचालनालयाला दाखविण्यास सांगितले आहे. तुलसियानी ग्रुपने त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम भरली, असेही या नोटिसीत विचारण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये किरीट जसवंत शाह यांनी गौरी खान यांच्यासह तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार आणि महेश तुलसियानी यांच्याविरुद्ध लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसात दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गौरी खानची जाहिरात पाहून मी फ्लॅट खरेदी केला. त्यांची विश्वासार्हता ब्रँडशी जोडलेली होती. आता बिल्डर ना फ्लॅटचा ताबा देत आहे ना पैसे परत करत आहे.
ED notice to actor Shahrukh’s wife Gauri; Brand Ambassador of Tulsiani Group
महत्वाच्या बातम्या
- एसटी बसस्थानकांचा MIDC कडून होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, 600 कोटींचा सामंजस्य करार
- मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा; शेतकऱ्यांना 44 हजार 248 कोटींची मदत; शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृतिदलाची पुनर्स्थापना
- भारतात कोरोनामुळे एका दिवसात 5 जणांचा मृत्यू; 335 नवीन रुग्ण; केरळमध्ये नवा प्रकार सापडला