• Download App
    "इंडी" आघाडी सैरभैर; पण 195 उमेदवार जाहीर करून भाजपचा दणका; शिवराज सिंह चौहान, बांसुरी स्वराज मैदानात!! |Ed leader Sairbhair; But BJP's blow by announcing 195 candidates; Shivraj Singh Chauhan, Bansuri Swaraj Maidan!!

    “इंडी” आघाडी सैरभैर; पण 195 उमेदवार जाहीर करून भाजपचा दणका; शिवराज सिंह चौहान, बांसुरी स्वराज मैदानात!!

    अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसींना संधी, 34 मंत्र्यांना संधी!!


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपाच्या पेचात अजूनही काँग्रेस प्रणित इंडी आघाडी अडकली आहे, पण भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी पहिल्याच झटक्यात जाहीर करून विरोधकांना दणका दिला आहे.Ed leader Sairbhair; But BJP’s blow by announcing 195 candidates; Shivraj Singh Chauhan, Bansuri Swaraj Maidan!!

    भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एटा येथून राजवीर सिंह, अमेठी येथून स्मृती इराणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.



    राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशची निवडणूक समिती यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अंतिम चर्चा ही 29 मार्चला चर्चा झाली. यावेळी 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 195 जागांचा निर्णय झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार, 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावं या यादीत आहे. लोकसभा अध्यक्षांचे नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचे नाव आहे. यामध्ये 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आले आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

    एकूण 195 उमेदवारांची घोषणा

    “उत्तर प्रदेशच्या 55 जागांची आम्ही घोषणा करत आहोत, प. बंगालच्या 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 14 पैकी 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीर 2, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दिव-दमन 1, अशा 195 जागांची आम्ही घोषणा करत आहोत”, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

    वाराणसी येथून नरेंद्र मोदी, अंदमान निकोबार येथून बिष्णू पडा रे, अरुणाचल प्रदेश पूर्व किरण रिजिजू, अरुणाचल प्रदेश पश्चिममधून तापिर गाओ, आसाम करिमगंजमधून अनुसूचित जातीकडून कृपानाथ मल्ला, सिलचरमधून परिमल शुक्ला बैद्य, ऑटोनमस जिल्हा शेड्यूल ट्राईब अरमसिंग इसो” अशी माहिती तावडे यांनी दिली.

    लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दोन दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरविण्याबाबत चर्चा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बैठकीला उपस्थित होते. रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आज भाजपकडून अधिकृत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

    वाचा कुणाकुणाला संधी

    गांधीनगर – अमित शाह

    चांदनी चौक (दिल्ली) – प्रवीण खंडेवाल

    नॉर्थ ईस्ट दिल्ली – मनोज तिवारी

    नई दिल्ली – बांसुरी स्वराज

    दक्षिणी दिल्ली – रामवीर सिंह

    वेस्ट दिल्ली – कमलजीत सहरावत

    गुना – ज्योतिरादित्य सिंधिया

    विदिशा – शिवराज सिंह चौहान

    भोपाल – आलोक शर्मा

    खजुरोह – बीडी शर्मा

    मंडला – फग्गन सिंह

    बीकानेर – अर्जुन मेघवाल

    अलवर – भूपेंद्र यादव

    सीपी जोशी- चित्तौड़गढ़

    कोटा- ओम बिरला

    झालावाड़- दुष्यंत सिंह

    जोधपुर- गजेंद्र शेखावत

    लखनऊ – राजनाथ सिंह

    अमेठी- स्मृति इरानी

    महाराजगंज- पंकज चौधरी

    डुमरियागंज- जगदंबिका पाल

    चंदौली- महेंद्रनाथ पाण्डेय

    जौनपुर- कृपाशंकर सिंह

    सलेमपुर- रविंद्र कुशवाहा

    आजमगढ़- निरहुआ

    बासगांव- कमलेश पासवान

    कुशीनगर- विजय दुबे

    गोरखपुर- रविकिशन

    संतकबीरनगर- प्रवीण निषाद

    बस्ती- हरीश द्विवेदी

    गोंडा- कीर्तिवर्धन सिंह उर्फ राजा भैया

    श्रावस्ती- साकेत मिश्रा

    आंबडेकर नगर- रितेश पाण्डेय

    फैजाबाद- लल्लू सिंह

    फतेहपुर- साध्वी निरंजन ज्योति

    बांदा- आरके सिंह पटेल

    हमीरपुरपुर- कुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल

    झांसी- अनुराग शर्मा

    जालौन- भानुप्रताप वर्मा

    कन्नौज- सुब्रत पाठक

    त्रिपुरा वेस्ट – विप्लव

    उधमपुर – जितेंद्र सिंह

    जम्मू – जुगल किशोर शर्मा

    अंडमान – विष्णु पडारे

    अरुणाचल वेस्ट – किरण रिजिजू

    अरुणाचल ईस्ट- तापिर गाव

    सिलचर – परिमल

    मंगलदोई – दिलीप सेकिया

    सरगुजा – चिंतामणि महाराज

    तिरुवनंतपुरम : राजीव चंद्रशेखर

    Ed leader Sairbhair; But BJP’s blow by announcing 195 candidates; Shivraj Singh Chauhan, Bansuri Swaraj Maidan!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य