• Download App
    अनिल देशमुख नव्हे, तर त्यांचे वकील समोर आले, म्हणाले, अनिल देशमुख गायब नाहीत|ED interrogates businessman Avinash Bhosale's son Amit for five hours

    अनिल देशमुख नव्हे, तर त्यांचे वकील समोर आले, म्हणाले, अनिल देशमुख गायब नाहीत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख हे गायब झालेले नाहीत. ते जेव्हा सक्तवसूली संचलनालय ED बोलावते तेव्हा प्रतिनिधीमार्फत किंवा वकीलांमार्फत हजर राहतात, असा खुलासा अनिल देशमुखांचे वकील इंदर पाल सिंग यांनी केला आहे. ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours

    अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय भूमिगत झाले आहेत. गायब झाले आहेत. अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख किंवा त्यांचा परिवार नाही, पण त्यांचे वकील इंदर पाल सिंग हे पुढे आले आणि त्यांनी खुलासा केला आहे.



    इंदर पाल सिंग म्हणाले, की ED ने अनिल देशमुखांचे आयटी रिर्टन, प्रॉपर्टी डिटेल्स आणि प्रॉपर्टी सोर्स मागितले आहेत. त्या सगळ्यांची कागदपत्रे आम्ही ED ला दिली आहेत. आरती देशमुख यांना हजर राहण्यास त्यांनी सांगितले होते. त्यांच्या वतीने मी ED समोर उभा राहिलो आहे, असे इंदर पाल सिंग यांनी सांगितले.

    याचा अर्थ इंदर पाल सिंग यांनी अनिल देशमुख हे कुठेही गेले नसल्याचा खुलासा केला असला आणि त्यांच्या वतीने वकील म्हणून ते आधी समोर आले असले तरी आज ते आरती देशमुख यांच्या वतीने ED समोर हजर झाले आहेत.

    ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार