वृत्तसंस्था
नवी दिल्ली : १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख हे गायब झालेले नाहीत. ते जेव्हा सक्तवसूली संचलनालय ED बोलावते तेव्हा प्रतिनिधीमार्फत किंवा वकीलांमार्फत हजर राहतात, असा खुलासा अनिल देशमुखांचे वकील इंदर पाल सिंग यांनी केला आहे. ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours
अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय भूमिगत झाले आहेत. गायब झाले आहेत. अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख किंवा त्यांचा परिवार नाही, पण त्यांचे वकील इंदर पाल सिंग हे पुढे आले आणि त्यांनी खुलासा केला आहे.
इंदर पाल सिंग म्हणाले, की ED ने अनिल देशमुखांचे आयटी रिर्टन, प्रॉपर्टी डिटेल्स आणि प्रॉपर्टी सोर्स मागितले आहेत. त्या सगळ्यांची कागदपत्रे आम्ही ED ला दिली आहेत. आरती देशमुख यांना हजर राहण्यास त्यांनी सांगितले होते. त्यांच्या वतीने मी ED समोर उभा राहिलो आहे, असे इंदर पाल सिंग यांनी सांगितले.
याचा अर्थ इंदर पाल सिंग यांनी अनिल देशमुख हे कुठेही गेले नसल्याचा खुलासा केला असला आणि त्यांच्या वतीने वकील म्हणून ते आधी समोर आले असले तरी आज ते आरती देशमुख यांच्या वतीने ED समोर हजर झाले आहेत.
ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours
महत्त्वाच्या बातम्या
- पिगासद्वारे हेरगिरीचे वृत्त देण्यामागची क्रोनाालॉजी समजून घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप
- छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ भाषा वापरलीच, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून स्पष्ट
- तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या
- तृणमूळच्या खासदाराने केली ममतांची “राष्ट्रीय” महत्त्वाकांक्षा जाहीर; 2024 मध्ये केंद्रात ममता बॅनर्जींचे सरकार…!!