40.92 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे आहे प्रकरण
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने 40.92 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी तुरुंगात असलेले पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार जसवंत सिंग गज्जनमाजरा यांच्यासह सहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ED files FIR against six people including jailed AAP MLA in Punjab
६ नोव्हेंबर २०२३ रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी संगरूरच्या अमरगढ विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार जसवंत सिंह गज्जनमाजरा यांना ४१ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली होती.
गज्जन माजरा हे तेच आमदार आहेत ज्यांनी पंजाबच्या बिकट आर्थिक स्थितीचा दाखला देत केवळ एक रुपया पगार घेण्याची घोषणा केली होती. त्यांना अटक झाली तेव्हा ते पक्ष कार्यालयात नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेत होते.
ED files FIR against six people including jailed AAP MLA in Punjab
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन यांना धक्का, वहिनी सीता सोरेन यांचा भाजप प्रवेश; झारखंडमध्ये सर्व 14 जागांवर कमळ फुलवण्याचा निर्धार
- राहुल गांधींवर “शक्ती” पडली भारी; मोदींची दक्षिण दिग्विजयाची तयारी!!
- अजितदादांवरच्या “नालायक” टीकेला बारामतीकरांचे प्रत्युत्तर; श्रीनिवास बापू तुम्ही फक्त अजितदादांचे छोटे भाऊ म्हणून मिरवलात!!
- घड्याळ चिन्ह गोठवण्याची पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, पण अजितदादांना घातली “ही” अट!!