वृत्तसंस्था
नवी दिल्ली : National herald case मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात राऊत अवेन्यू कोर्टात आज खटला दाखल केला.
National herald case मध्ये ED ने आधीच काँग्रेसच्या मुखपत्राच्या दिल्ली, लखनऊ आणि मुंबईतल्या मालमत्तांवर टांच आणली असून या मालमत्तांची एकत्रित किंमत तब्बल 661 कोटी रुपये आहे. या सर्व मालमत्तांवर ED ने जप्तीची नोटीस चिकटवली आहे.
आता त्या पुढे जाऊन ED ने आज राऊज अवेन्यू कोर्टामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात प्रॉसिक्युशन कंप्लेंट दाखल केली. यामध्ये ED ने PMLA अर्थात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्री एक्टच्या कलम 44 आणि 45 तसेच सेक्शन 3 आणि सेक्शन 70 यांचा उल्लेख केला असून ही सगळी सेक्शन्स आणि कलमे शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी आहेत. वर उल्लेख केलेल्या सगळ्या नेत्यांवर या सेक्शन आणि कलमांनुसार खटला चालवण्याचा ED ने कोर्टापुढे इरादा व्यक्त केला आहे. कोर्टाने या संदर्भातील सुनावणी 25 एप्रिल रोजी ठेवली आहे.
ED files case in Raut Avenue Court National Herald case
महत्वाच्या बातम्या
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नाशिकचा रामतीर्थ गोदा घाट समता, बंधुता आणि समरसतेच्या आरतीने दुमदुमला!!
- Virendra Kumar राजकीय फायद्यासाठी विरोधक आंबेडकरांचे नाव वापरत आहेत – वीरेंद्र कुमार
- Mehul Choksi : मोठी बातमी! फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
- Ram Temple Trust राम मंदिर ट्रस्टला आला धमकीचा ईमेल, तामिळनाडूशी जुडले तपासाचे धागेदोरे