वृत्तसंस्था
बेंगलोरु : 50 कोटींचा कोल्हा कुत्रा आणला घरी, तपासासाठी ED धडकली दारी!!, असे खरंच कर्नाटकची राजधानी बेंगलुरु मध्ये घडले.
बेंगलोर मधले प्रख्यात डॉग ब्रिडर सतीश यांनी जगातला सगळ्यात महागडा आणि दुर्मिळ कोल्हा कुत्रा म्हणजेच wolfdog तब्बल 50 कोटी रुपयांना खरेदी करून आणला. त्याचे प्रदर्शन इंस्टाग्राम सह सगळ्या सोशल मीडियावर केले. त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केले. कॅकेशिअन शेफर्ड आणि जंगली कोल्हा यांच्या संकरातून हा कोल्हा कुत्रा म्हणजेच wolfdog जन्माला आल्याचे त्याने सोशल मीडियावर जाहीर केले. त्यामुळे बंगलोर मधल्या आणि देशातल्या कुत्रा प्रेमींमध्ये सतीश आणखी फेमस झाला. पण हीच फेम नंतर त्याच्या अंगलट आली.
सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने सतीश यांच्या बंगल्यावर छापा घालून त्याचा खोटेपणा उघडा पाडला. हा दुर्मिळ कोल्हा कुत्रा म्हणजेच wolfdog खरंच 50 कोटी रुपयांना खरेदी केला का??, याचा तपास केला. सतीश याची सगळी डॉक्युमेंट्स तपासली. मात्र, त्याच्याकडे त्यासंबंधी कुठलाच अधिकृत पुरावा आढळला नाही. सतीश केवळ प्रसिद्धीसाठी खोटे बोलल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ईडीने त्याच्या विरोधात फेक न्युज पसरवून सार्वजनिक फसवणूक देखील गुन्हा दाखल केला.
सतीश याच्या बंगल्यावरील छापा त्याला फार महागात गेला. कारण सतीशचे सगळे इन्कम सोर्स ईडीच्या स्कॅनर खाली आले. सतीश याच्या विरुद्धची कायदेशीर कारवाई वेगात सुरू झाली.
ED Bengaluru dog breeder Satish, who claimed to have bought the world’s most expensive dog for Rs 50 crore
महत्वाच्या बातम्या
- Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
- Assam : तमिळ-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये आसामी भाषा सक्तीची
- Waqf Act : ‘पाकिस्तानने स्वतःच्या खराब रेकॉर्डकडे लक्ष द्यावे’, वक्फ कायद्याविरोधात बोलणाऱ्याला भारताने फटकारले!