वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ED अर्थात सक्तवसुली संचलनालय फुल स्विंग मध्ये आले असून कारवाईचा धडाका सुरू केली आहे.
ED ACTION ON BYJU’S; 9362.35 crores notice in respect
नॅशनल हेराल्ड केस मध्ये गांधी परिवाराला दणका देत ED ने तब्बल 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्या पाठोपाठ शैक्षणिक क्षेत्रात दबदबा असणारी कंपनी BYJU’S चा मालक रवींद्रन यांना 9362.35 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल नोटीस पाठवली आहे. परकीय चलन विनिमय कायदा अर्थात FEMA चे उल्लंघन करून 9362.35 कोटी रूपये ही रक्कम परदेशात पाठविल्याचा रवींद्रन यांच्यावर आरोप आहे.
बंगलोर स्थित रवींद्रन यांची थिंक अँड लर्न ही कंपनी आहे. या कंपनीमार्फतच BYJU’S वेगवेगळ्या शैक्षणिक कोर्सेसच्या क्लासशी संबंधित कंपनी चालवली जाते. या कंपनीची जाहिरात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान करतो.
BYJU’S या कंपनीत 2011 ते 2023 या 13 वर्षांमध्ये तब्बल 28000 कोटींची परकीय गुंतवणूक थिंक अँड लर्न कंपनीला मिळाली. पण अमेरिकेत रवींद्रन यांच्या विरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कंपनीची घसरण झाली. याच दरम्यान 9362.35 कोटी रुपये परदेशात पाठविण्यात आल्याचे ईडीच्या चौकशी आणि तपासात स्पष्ट झाले. एवढी मोठी रक्कम परकीय चलन विनिमय कायदा अर्थात FEMA उल्लंघन करून पाठविले गेल्याची ईडीची माहिती आहे. याच मुद्द्यावरून उत्तर मागण्यासाठी ईडीने रवींद्रन यांना नोटीस पाठविली आहे.
ED ACTION ON BYJU’S; 9362.35 crores notice in respect
महत्वाच्या बातम्या
- सरकार बनताच 4 टक्के मुस्लीम आरक्षण हटवले जाईल’, तेलंगणात गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
- अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर यांची विश्वचषकाबाबत पोस्ट व्हायरल!
- ‘हिंदू राष्ट्रा’साठी संविधानात दुरुस्ती करा, धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांची मागणी!
- महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या रूपात अण्णा हजारे नव्हे, तर पवारांसाठी शरद जोशी + दत्ता सामंत यांच्या बफर नेतृत्वासारखा प्रयोग!!