मालेगावातून मास्टरमाईंड सिराज मोहम्मद आणि बँक व्यवस्थापक निकमला अटक
विशेष प्रतिनिधी
नाशिक : Vote Jihad महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान घडवावे यासाठी व्होट जिहाद करून हवाला रॅकेट मार्फत तब्बल 125 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करणाऱ्या मास्टरमाईंड सिराज मोहम्मदला आणि बँकेचा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना पोलिसांनी धडक कारवाई करून मालेगावातून अटक केली.Vote Jihad
*त्याचबरोबर सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने मालेगाव नाशिक मुंबई सुरत अहमदाबाद इथल्या वेगवेगळ्या 20 लोकेशन्स वर छापे घातले आहेत. यातून मोठी धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. व्होट जिहादसाठी केवळ देशातल्याच नव्हे, तर देशाबाहेरच्या देखील घातपाती शक्ती कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ED अधिकाऱ्यांनी छापे घालून कठोर कारवाईला सुरुवात केली. या कारवाईचे तपशील टप्प्याटप्प्याने ED जाहीर करणार आहे.*
मालेगाव येथील बँकेतून 125 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे उघड झाले, तर काल कोकणात पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप केला आहे. व्होट जिहादच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. मालेगाव बँकेत बेहिशोबी 125 कोटी रुपये आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणातील मास्टरमाईंड सिराज मोहम्मद याला आणि नाशिक मर्चेंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक केली.
मालेगावमध्ये बेहिशोबी पैशांचा पाऊस
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथील बँकेत बेहिशोबी पैसा हवालामार्फत जमा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी 125 कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा झाल्याचे आणि तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. हा पैसा वोट जिहाद असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर यापूर्वी मालेगावमध्ये 250 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते.
एकाच महिन्यात 2500 व्यवहार
एका महिन्यात देशभरातील 200 बँक खात्यातून 2500 व्यवहार झाले. त्यातून रक्कमेची मोठी उलाढाल करण्यात आली. मालेगाव येथील सिराज अहमद आणि मोईन खान यांनी गरीब लोकांच्या नावाने बँक खाती उघडली. त्यात चार दिवसांत 125 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील 37 खात्यातील जमा रक्कम रोखीत बदलण्यात आली. ही रक्कम लागलीच काढण्यात आली.
सोमय्या यांनी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सीबीडीटी, आरबीआयसह अनेक ठिकाणी लिखित तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली होती. याप्रकरणात मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही रक्कम परदेशातून आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मालेगावातील 17 गरीब लोकांच्या नावे खाते उघडल्याचे समोर आले आहे.
ED action against Vote Jihad in Malegaon, Nashik, Mumbai, Surat, Ahmedabad; Raids at 20 locations!!
महत्वाच्या बातम्या
- CISFच्या पहिल्या महिला बटालियनला केंद्राची मंजुरी; विमानतळ, मेट्रो आणि VIP सुरक्षा सांभाळणार, गृहमंत्री अमित शहांची घोषणा
- Ashok Chavan : अशोक चव्हाणांचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर; काँग्रेसमध्ये असताना 14 वर्षे खूप सोसले, आता चारही बाजूंनी हल्ले
- Amit Shah : ‘महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेबचा फॅन क्लब’
- Vote Jihad : मालेगावातून मास्टरमाईंड सिराज मोहम्मद आणि बँक व्यवस्थापक निकमला अटक; पोलिसांची धडक कारवाई!!