• Download App
    लालू कुटुंबाला ईडीचा दणका; बिहार आणि गाझियाबादेतील संपत्ती जप्त; तब्बल 6 कोटी 2 लाखांची मालमत्ता|ED action against Lalu family; Confiscation of property in Bihar and Ghaziabad; 6 Crore 2 Lakh property

    लालू कुटुंबाला ईडीचा दणका; बिहार आणि गाझियाबादेतील संपत्ती जप्त; तब्बल 6 कोटी 2 लाखांची मालमत्ता

    वृत्तसंस्था

    पाटणा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरजेडी सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची 6 कोटी 2 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात गाझियाबाद आणि बिहारमधील सर्व संपत्तीचा समावेश आहे. या प्रकरणात लालू प्रसाद, राबडी देवी, तेजस्वी, मीसा, हेमा यांच्यासह आरोपींची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात आयआरसीटीसी प्रकरणी सुनावणी झाली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.ED action against Lalu family; Confiscation of property in Bihar and Ghaziabad; 6 Crore 2 Lakh property



    काय आहे IRCTC प्रकरण?

    RJD सुप्रीमो लालू यादव IRCTC (इंडियन रेल टुरिझम अँड केटरिंग कॉर्पोरेशन) निविदा घोटाळ्यात अडकले आहेत. 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री असताना भुवनेश्वर आणि रांची येथे दोन हॉटेल चालवण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप लालूप्रसाद यांच्यावर आहे. या बदल्यात या कंपनीने त्यांना पाटणा येथील सगुणा मोड भागात 3 एकर जमीन दिली. याप्रकरणी सीबीआयने लालू यादव, राबडी देवी आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.

    या सर्वांना दोन वर्षांपूर्वी जामीन मिळाला होता. IRCTC निविदा घोटाळा प्रकरणात तेजस्वी आणि इतर आरोपींवर IPCच्या कलम 420, 120B आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव यांच्यासह प्रेम गुप्ता, सरला गुप्ता यांच्यासह रेल्वे अधिकारी केके गयाल आणि राकेश सक्सेना यांना आरोपी करण्यात आले होते.

    काय आहेत आरोप?

    लालू प्रसाद रेल्वेमंत्री असताना 2004 ते 2009 दरम्यान रांची आणि पुरी येथील आयआरसीटीसीची दोन हॉटेल्स सुजाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला भाड्याने देण्यात आल्याचा आरोप आहे. खासगी कंपनीला हॉटेल भाडेतत्त्वावर देण्याच्या बदल्यात लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी पाटण्यात कंपनीकडून सुमारे तीन एकर किमतीची जमीन घेतल्याचा आरोप सीबीआयने केला होता.

    ही जमीन राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या मालकीची लारा प्रोजेक्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आली होती. रेल्वे हॉटेल्स भाडेतत्त्वावर देण्याच्या बदल्यात डिलाईट कंपनीला जमीन दिल्याचा आरोपही आहे. नंतर लारा कंपनीने त्या कंपनीकडून कमी किमतीत जमीन खरेदी केली. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

    ED action against Lalu family; Confiscation of property in Bihar and Ghaziabad; 6 Crore 2 Lakh property

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती