• Download App
    समाजवादी पक्षाच्या माजी खासदारावर ईडीची कारवाई, आठ कोटींवर मालमत्ता जप्त|ED action against former Samajwadi Party MP, assets worth over Rs 8 crore confiscated

    समाजवादी पक्षाच्या माजी खासदारावर ईडीची कारवाई, आठ कोटींवर मालमत्ता जप्त

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा माजी खासदार आणि गँगस्टर अतीक अहमद आणि त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने त्यांची ८.१४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.ED action against former Samajwadi Party MP, assets worth over Rs 8 crore confiscated

    ईडीच्या लखनऊ प्रादेशिक कार्यालयाने ही कारवाई केली. ईडीचे प्रादेशिक संयुक्त संचालक राजेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अतीक अहमद आणि त्यांची पत्नी शाइस्ता परवीन या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे.



    यात अलाहाबादमधील फुलपूर येथे परवीनच्या नावावर असलेला भूखंड ईडीने जप्त केला आहे. या भूखंडाचे सरकारी मूल्य ६.८६ कोटी इतके असून अतीक अहमद याने ४.५ कोटींना हा भूखंड खरेदी केला आहे, असे आढळून आले आहे. याशिवाय ईडीने अतीक अहमद याची १० बँक खाती तसेच परवीनच्या एका बँक खात्यातील मिळून १.२५ कोटी रुपये इतकी रोकड जप्त केली आहे.

    अतीक अहमद (५९) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला गुजरातमधील साबरमती जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात त्याची चौकशी केली असून त्याचा जबाबही नोंदवला आहे. अतीकवर उत्तर प्रदेशातही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    अतीकने गुन्हेगारी कारवायांमधून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली असून नातेवाईकांच्या खात्यातही मोठी रक्कम जमा वळवली आहे. त्याचा तपास केला जात असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. आयकर विभाग तसेच इतर सरकारी विभागांकडून याबाबत बराच तपशील मिळाला असून त्याचाही तपास केला जात आहे.

    अतीक अहमद हा समाजवादी पक्षाकडून ाश्चिम अलाहाबाद विधानसभा मतदारसंघातून तो पाचवेळा विजयी झाला आहे. २००४ मध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन अतीक अहमद लोकसभेत पोहचला होता. आता समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्याने सप्टेंबर महिन्यातच एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. काही काळ तो अपना दलातही होता.

    ED action against former Samajwadi Party MP, assets worth over Rs 8 crore confiscated

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??