भारतीय अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी करत चीनलाही टक्कर दिली होती.संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असतानाही, त्यातून मार्ग काढत आणि कोरोनाला नियंत्रणात ठेवत भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अतिशय चांगली कामगिरी केली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आहे. the first quarter the Indian economy outperformed China
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : भारतीय अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी करत चीनलाही टक्कर दिली होती.संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असतानाही, त्यातून मार्ग काढत आणि कोरोनाला नियंत्रणात ठेवत भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अतिशय चांगली कामगिरी केली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आहे.
चीनच्या बरोबरीने भारताने आयात आणि निर्यातीमध्येही या तीन देशांनी आघाडी घेतली आहे. याच काळात जागतिक व्यापारही सावरला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
व्यापार आणि विकासावरील संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पहिल्या तिमाहीच्या काळातील जागतिक व्यापाराचा बुधवारी आढावा घेण्यात आला. वस्तू व सेवेतील जागतिक व्यापारात चार टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे यावेळी दिसून आले.
जगावर कोरोनाचे संकट येण्यापूर्वी जागतिक व्यापार जितकी वाढ झाली होती, त्यापेक्षा तीन टक्यांनी जास्त व्यापार कोरोनाच्या या संकटकाळात झाला. पूर्व आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांची चमकदार कामगिरी आणि या देशांकडून होत असलेली निर्यात यामुळे जागतिक आयात-निर्यातीत सातत्याने वाढ होत राहणार असल्याचे भाकीतही अहवालात नोंदविण्यात आले आहे.
वस्तू क्षेत्रातील व्यापारात ज्या गतीने वाढ झाली, त्या तुलनेत सेवा क्षेत्रातील व्यापारात वाढ झालेली नसल्याचेही यात नमूद आहे. अजूनही बहुतेक सर्वच देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत आहेत. अनेकांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. मात्र, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका देश या महामारीत नागरिकांचे आयुष्य वाचविण्यासोबतच अर्थव्यवस्था मजबूत कशी राहील, यावर विशेष भर देत आहेत, असेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
the first quarter the Indian economy outperformed China
महत्वाच्या बातम्या
- सेवा ही संघटन : ‘तौक्ते’चा तडाखा-महाराष्ट्र संकटात ; मुख्यमंत्री ठाकरे घरात-फडणवीस कोकणात
- स्तनपान करणाऱ्या माताही होणार ‘लसवंत’ ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नवीन निर्देश
- दुर्दैवी ! राज्य सरकार आपल्या डॉक्टरांची सुरक्षा करण्याबाबत अजिबात गंभीर नाही ; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले
- ‘शाहू-फुले-आंबेडकर’चा जयघोष करणाऱ्या ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’ला मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम राखता येईना
- पश्चिम बंगाल, ओडिशाला चक्रवादळाचा धोका, तोत्केनंतर आता यास चक्रीवादळ
- देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे – पवार सरकारवर टीकास्र; गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत!