तरुणाईने गुंतवणुकीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पैसा पैश्याला बनवतो आणि म्हणूनच पहिल्या वेतनापासूनच आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत करण्यास सुरवात केली पाहिजे. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्यासाठी काही सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय माहिती असले पाहिजेत. इक्विटी म्हणजेच भारतीय शेअर बाजाराला मोठी क्षमता आहे. भारतीय कंपन्या सतत चांगली वाटचाल करीत आहेत. बर्या च क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे आणि त्यांचा व्यवसाय वाढत आहे. ब्लू-चिप्स कंपन्या या सर्व वेळत म्हणजे जेंव्हा अर्थव्यवस्था चांगली असते अथवा आजच्या परिस्थितीसारखी आशंकित असेली तरी खरेदी करण्या योग्य असतात. Start investing from the first salary
एचडीएफसी बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स आणि मारुती टी सी एस सारखे स्टॉक भविष्यात एक चांगला परतावा देऊ शकतात. ज्यांना डायरेक्ट इक्विटी समजू शकत नाही, त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी म्युच्युअल फंड सर्वोत्तम मार्ग आहे. त्यातही एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे ज्यात ४ ते ५ प्रकारचे वेगवेगळे म्युच्युअल फंड असतील. कोर आणि सॅटेलाईट दृष्टिकोनातून असा पोर्टफोलिओ तयार करण्याचा विचार केला पाहिजे. या पॅटर्नमध्ये इंडेक्स फंडात किंवा लार्ज आणि मिडकॅप फंडामध्ये पैसा अधिक प्रमाण जवळजवळ ५० टक्के गुंतविला जातो. एसआयपी गुंतवणूकीसाठी लार्ज-कॅप मध्ये १० ते ११ टक्के उत्पन्न मिळवू शकते. हे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला स्थिरता प्रदान करतात आणि शेयर बाजारातील चढ़ उताराचा धोका कमीतकमी करण्याचा प्रयत्न करतात उरलेला लहान हिस्सा २० ते १५ टक्के चांगल्या प्रतीच्या मिड आणि स्मॉल कॅप फंडामध्ये सॅटेलाइट पोर्टफोलिओ च्या अंतर्गत गुंतविला जातो ज्यामध्ये १३ ते १६ टक्के पर्यंत उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे.
उरलेले २५ ते ३० टक्के हे चांगल्या प्रतीच्या हायब्रीड इक्विटी फंडात गुंतवू शकतात जेणेकरून पडत्या बाजारात हा फंड तुमची जोखीम कमी करण्या साठी उपयूक्त ठरू शकेल . अशा प्रकारे बनवलेला पोर्टफोलिओ तुम्हाला चांगला परतावा पण देऊ शकतो असेच तुमची जोखीम हि योग्य प्रमाणात ठेवतो.