• Download App
    रुची सोयाकडून बाबा रामदेव यांच्या बिस्किट कंपनीची खरेदी, 60.02 कोटी रुपयांचा व्यवहार । Ruchi Soya Industries To Acquire Biscuits Business Of patanjali in 60 crore rupees

    रुची सोयाकडून बाबा रामदेव यांच्या बिस्किट कंपनीची खरेदी, 60.02 कोटी रुपयांचा व्यवहार

    Ruchi Soya Industries : रुची सोया इंडस्ट्रीजने घोषणा केली आहे की, ते योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (पीएनबीपीएल) चे अधिग्रहण करणार आहे. हा व्यवहार 60.02 कोटींचा असेल. या संदर्भात कंपनीने शेअर बाजाराला कळविले आहे. कंपनीने म्हटले आहे की, संचालक मंडळाने 10 मे रोजी पतंजली बिस्किटाबरोबर व्यापार हस्तांतरण करारावर सही करण्यास मान्यता दिली होती. पुढील दोन महिन्यांत हे अधिग्रहण पूर्ण होईल. Ruchi Soya Industries To Acquire Biscuits Business Of Patanjali in 60 crore rupees


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रुची सोया इंडस्ट्रीजने घोषणा केली आहे की, ते योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (पीएनबीपीएल) चे अधिग्रहण करणार आहे. हा व्यवहार 60.02 कोटींचा असेल. या संदर्भात कंपनीने शेअर बाजाराला कळविले आहे. कंपनीने म्हटले आहे की, संचालक मंडळाने 10 मे रोजी पतंजली बिस्किटाबरोबर व्यापार हस्तांतरण करारावर सही करण्यास मान्यता दिली होती. पुढील दोन महिन्यांत हे अधिग्रहण पूर्ण होईल.

    अधिग्रहणाची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल

    व्यवसाय हस्तांतरण कराराअंतर्गत अधिग्रहण रक्कम 60.02 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही संपादन रक्कम घटत्या विक्रीच्या आधारे केली गेली आहे. रुची सोयाने पुढे म्हटले की, कंपनी अधिग्रहणाची रक्कम दोन हप्त्यांमध्ये देईल. त्यापैकी 15 कोटी रुपये कराराच्या तारखेला किंवा त्यापूर्वी देण्यात येतील, तर उर्वरित 45.01 कोटी रुपये कराराच्या 90 दिवसांच्या आत दिले जातील.

    गैर-स्पर्धात्मक करारावरही सहमती

    एवढेच नव्हे तर कंपनीने असेही म्हटले आहे की, ते आणि पतंजली बिस्किट कंपनीची गैर स्पर्धात्मक करारावरही सहमती झाली आहे. ज्याअंतर्गत पीएनबीपीएल आणि तिच्याशी संबंधित कंपन्या भारतातील बिस्किटाच्या कोणत्याही स्पर्धात्मक व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रवेश करणार नाहीत.

    कर्जाखाली दबली होती रुची सोया

    रुची सोया भारतात न्यूट्रिला, महाकोश, रुचि गोल्ड, रुचि स्टार आणि सनरिक या ब्रँड्ससह व्यवसाय करते. रुची सोया कर्जबाजारी कंपनी होती. 2019 मध्ये पतंजली आयुर्वेदने ही कंपनी 4350 कोटींमध्ये खरेदी केली होती. यासाठी पतंजलीनेही 3200 कोटींचे कर्ज घेतले. यामुळे आताच्या व्यवहारात भलेही एक कंपनी दुसऱ्या कंपनीला विकत घेताना दिसत असले तरी वास्तवात दोन्ही बाबा रामदेव यांच्याच कंपन्या आहेत. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी 2006 मध्ये पतंजलीची सुरुवात केली होती.

    Ruchi Soya Industries To Acquire Biscuits Business Of Patanjali in 60 crore rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती