OPEC countries agree to increase oil production : भारताच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ओपेक देशांनी अखेर अमेरिकेच्या विनंतीवर तेलाचे उत्पादन वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. यानुसार मेपासून तेल उत्पादना वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत कमी होऊ शकतात. परिणामी, भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच दिलासा मिळू शकेल. Relief on petrol-diesel soon, OPEC countries agree to increase oil production
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ओपेक देशांनी अखेर अमेरिकेच्या विनंतीवर तेलाचे उत्पादन वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. यानुसार मेपासून तेल उत्पादना वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत कमी होऊ शकतात. परिणामी, भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच दिलासा मिळू शकेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने सौदी अरेबियाला तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्पादन वाढीवर विचार करण्याची विनंती केली होती.
ओपेक प्लस तेल उत्पादक देशांची एक संस्था आहे ज्यात इराक, कुवैत, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, अझरबैजान, बहरीन, ब्रुनेई, कझाकस्तान, मलेशिया, मेक्सिको, ओमान, रशिया, दक्षिण सुदान आणि सुदान यांचा समावेश आहे. सध्या अमेरिकेच्या WTIक्रूड 61 डॉलर प्रति बॅरल असून लंडनचा ब्रेंट क्रूड 65 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे.
भारताच्या मागणीकडे दुर्लक्ष
यापूर्वी अमेरिका आणि भारत सरकारने वारंवार तेलाचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते, परंतु ओपेक प्लस देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ओपेक प्लस देशांच्या या भूमिकेवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाराजी जाहीर केली होती.
यावर झाली सहमती
गतवर्षी कोरोना संकटात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या, तेव्हा ओपेक प्लस देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, ओपेक देशांनी सहमती दर्शविली आहे की, मे महिन्यात दररोज 3.5 लाख बॅरल प्रति दिन (बीपीडी), जूनमध्ये 3.5 लाख बीपीडी आणि जुलैमध्ये 4 लाख बीपीडी उत्पादन वाढवण्यात येईल. जुलैपर्यंत कच्च्या तेलाचे उत्पादन या समूहातर्फे दररोज 11 लाख बॅरेल केले जाईल, असे म्हणून इराणचे पेट्रोलियम मंत्री बिजान जंगानेह यांनीही दुजोरा दिला आहे.
Relief on petrol-diesel soon, OPEC countries agree to increase oil production
महत्त्वाच्या बातम्या
- दाऊदच्या डोंगरीतील ड्रग्ज फॅक्टरीचा मॅनेजक दानिश चिकणाला राजस्थानाच्या कोटामधून अटक; एनसीबीची आत्तापर्यंतची मोठी सफलता
- आसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM?, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान
- मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते : महाराष्ट्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाशिक महानगरपालिके समोरच ‘ त्या ‘ कोव्हीड रूग्णाचा करूण अंत
- द्रमुक नेते स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, मोठी रोकड लपवल्याचा संशय
- Pulwama Encounter : पुलवामात सुरक्षा दलाचे मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा