RBI Credit Policy : आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सांगितले की, रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% एवढाच राहील. यासोबतच आरबीआयने सन 2021-22 साठी 10.5% जीडीपी वृद्धीचा अंदाज व्यक्त केला. RBI Credit Policy No change in interest rates, RBI forecasts 10.5% GDP growth
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सांगितले की, रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% एवढाच राहील. यासोबतच आरबीआयने सन 2021-22 साठी 10.5% जीडीपी वृद्धीचा अंदाज व्यक्त केला.
आर्थिक धोरण सादर आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, “कोरोना महामारी असूनही देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. सध्या कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. तरीही भारत सर्व आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.” दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या आर्थिक धोरण समीक्षेत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यावेळीही रेपो 4% आणि रिव्हर्स रेपो रेटला 3.35 टक्केच ठेवण्यात आले होते.
मार्केट तज्ज्ञांनी यापूर्वीच अशा प्रकारचे संकेत दिले होते. तज्ज्ञांच्या मते, महागाई वाढल्याने सरकारसमोर ती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान आहे. कोरोना संसर्गाची वाढते प्रकरणे पाहता रिझर्व्ह बँकेने पतधोरणात नरमाईची भूमिका घेत ती आहे तशीच ठेवू शकते.
काय असतो रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
आरबीआय ज्या दरावर व्यावसायिक बँका आणि इतर बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट म्हटले जाते. रेपो रेट कमी होण्याचा अर्थ म्हणजे, बँकांकडून मिळणारे सर्व प्रकारचे लोन स्वस्त होतील. यामुळे त्याच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातही वाढ होते.
आता रिव्हर्स रेपो रेटबाबत समजून घेऊया. बँकांना त्यांनी आरबीआयकडे जमा केलेल्या रकमेवर ज्या दरानुसार व्याज मिळते, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. बँकांकडे जी जास्तीची रोख रक्कम असते, ती रिझर्व्ह बँकेकडे जमा केली जाते. यावर बँकांना व्याजही मिळते.
रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटचा तुम्हाला मिळणाऱ्या कर्जावर परिणाम
रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांचा आपसात संबंध आहे. एकीकडे आरबीआय रिव्हर्स रेपो रेट कमी करून बँकांना जास्त पैसे सोडते, यामुळे बँका जास्त लोन देऊ शकतात. दुसरीकडे, रेपो रेट कमी करून बँकांना स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करते. याचा फायदा बँका आपल्या ग्राहकांनाही देतात.
RBI Credit Policy No change in interest rates, RBI forecasts 10.5% GDP growth
महत्त्वाच्या बातम्या
- वसुली प्रकरणात देशमुखांच्या बचावात उतरली शिवसेना, विरोधकांवर ‘सामना’तून टोलेबाजी, येडियुरप्पांचं दिलं उदाहरण
- आमने-सामने : मोईन अलीबाबत लेखिका तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त ट्विट जोफ्रा आर्चर भडकला
- दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी रेड्डीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी
- एनआयएने केले नाट्यरूपांतर, वाझेची काढली कळवा ते सीएसटी लोकलवारी
- पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नऊ वर्षांच्या अद्वैतला राहूल गांधांनी घडविली विमानाची सफर