• Download App
    मनी मॅटर्स : पैशांची गरज सर्वांनाच, त्यामुळे हाती असलेल्या पैशांचे असे काळजीपूर्वक नियोजन करा। Money Matters: Everyone needs money, so plan your money carefully

    मनी मॅटर्स : पैशांची गरज सर्वांनाच, त्यामुळे हाती असलेल्या पैशांचे असे काळजीपूर्वक नियोजन करा

    कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांनाच पैशांची गरज भासते. कारण, पैसा आश्रय देणारा आहे. यात पती-पत्नीने एकमेकांवर भरवसा ठेवला पाहिजे आणि पैसे कसे खर्च करावेत हे दोघांनी मिळून ठरवले पाहिजे. त्यासाठी हाती असलेल्या पैशांचे काळजीपूर्वक नियोजन करा. तुम्ही तुमच्या पैशांचा उपयोग कसा कराल हे एकत्र मिळून ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कशाची गरज आहे आणि तुम्ही किती पैसे खर्च करू शकता हे ठरवा. एखादी गोष्ट विकत घेण्याची ऐपत असली म्हणजे ती घ्यावीच असे नाही. कर्जबाजारी होण्याचे टाळा. Money Matters: Everyone needs money, so plan your money carefully

    अंथरूण पाहून पाय पसरा. यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे पैसे उरले असतील तर त्याचे काय करावे हे एकत्र मिळून ठरवा. पैसे अपुरे पडल्यास खर्च कुठे कमी करता येईल हे ठरवा. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये जाण्याऐवजी तुम्ही घरीच स्वयंपाक करू शकता. तुम्ही किती कमवता आणि किती खर्च करता ते प्रामाणिकपणे आपल्या सोबत्याला सांगा. पैशांबद्दल महत्त्वाचे निर्णय घेताना नेहमी आपल्या सोबत्याशी चर्चा करा. यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात शांती राखण्यास मदत मिळेल. कमवलेला पैसा केवळ तुमचा नसून तुमच्या कुटुंबाचाही आहे असा विचार करा.

    यासाठी तुम्ही काय करू शकता. जेथे सोबत्याला विचारण्याची गरज नाही असे छोटेमोठे खर्च करण्यासाठी प्रत्येकी किती रक्कम बाजूला ठेवावी हे ठरवा. जगण्यासाठी पैशाची गरज असली, तरी त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ देऊ नका किंवा तुमच्यात अनावश्यक चिंता निर्माण होऊ देऊ नका. आनंदी जीवन जगण्यासाठी खूप जास्त पैशांची गरज नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. पैशाने तुम्ही बऱ्याच मौल्यवान गोष्टी विकत घेऊ शकत असला, तरी तुमच्या वैवाहिक जीवनासमोर त्यांना काहीच मोल नाही. तेव्हा, आहे त्यात समाधानी राहा.

    Money Matters: Everyone needs money, so plan your money carefully

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग