• Download App
    Money Matters: Always be prepared for sudden expenses

    मनी मॅटर्स : अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी स्वतःला नेहमी सज्ज ठेवा

    हातातील रोख पैसे नीट कसे वापरायचे हे जमले की दैनंदिन खर्चाची समस्या सुटते. मात्र आपल्या खर्चावर बारीक लक्ष ठेवून अनावश्यक खर्चाला आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी बजेटचे नव्याने नियोजन करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परीस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे किमान तीन महिने पुरेल इतका इमर्जन्सी फंड असणे आवश्यक आहे. तुम्ही अजून इमर्जन्सी फंडच तयार केला नसेल, तर सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या माध्यमातून हा फंड तयार करता येईल. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही स्थितीत कौटुंबिक-संबंधित खर्चात कपात करू शकत नाही. मात्र, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार किंवा हॉटेलिंग सारख्या गोष्टींवर खर्च कमी करून एकूण खर्चात कपात करू शकता. Money Matters: Always be prepared for sudden expenses

    इमर्जन्सी फंडात हस्तांतरण करता येईल यासाठी म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली नसेल तर, दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पर्सनल लोन हा उत्तम पर्याय आहे. थोड्या कालावधीसाठी पर्सनल लोन महत्वाचे ठरते. हे कर्ज कोणत्याही तारणाविना मिळत असल्याने कर्ज घेण्याऱ्याचे वय, उत्पन्न, चालू कर्जे आणि क्रेडिट स्कोअर इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. नोकरीअभावी दैंनदिन वस्तूंसाठी लागणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च उचलण्याची आपली मानसिक आणि आर्थिक क्षमता नसते.

    अशावेळी अचानक उद्भवणाऱ्या आणि टाळता न येणारा प्रमुख खर्च आजारपणात येणारा खर्च. त्यामुळे या खर्चापासून संरक्षण मिळविण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी स्वतः बरोबरच तुमच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांचा विमा उतरवणे अतिशय महत्त्वाचे आहे. विम्यामध्ये आयुर्विमा, टर्म इन्श्युरन्स, आरोग्य विमा, गृह विमा यांसारखी अनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. मात्र त्यातही केवळ विम्यापुरता विचार केल्यास टर्म इन्शुरन्स महत्वाचा ठरतो. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न वार्षिक सहा ते आठ लाख रुपये आहे अशांनी एक कोटींचा टर्म विमा काढायला हवा. त्यासाठी फार पैसे मोजावे लागतात असा विचार करीत बसू नये.

    Money Matters: Always be prepared for sudden expenses

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग