• Download App
    मनी मॅटर्स : संकटसमयी कामी येणारा बहुउपयोगी क्रिटीकल केअर इंश्युरन्स । Money Matters: A Multi-Useful Critical Care Insurance Used in Crisis

    मनी मॅटर्स : संकटसमयी कामी येणारा बहुउपयोगी क्रिटीकल केअर इंश्युरन्स

    बदलत्या जीवनशैली मुळे कर्करोग, हृदय विकार, ब्रेन ट्युमर , पक्षाघात , किडनी फेल्युअर यासारख्या आजारांची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महागड्या उपचारांमुळे आर्थिक समस्या पण उभी राहते. आजकाल लोक मेडिक्लेम इंश्युरन्स पॉलीसी घेतात. मात्र क्रिटीकल केअर इंश्युरन्स बाबत अजूनही लोकांना फार माहिती नसते. ही पॉलीसी असणाऱ्या व्यक्तीचे जर पॉलीसीत समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही आजारासाठी निदान झाले तर पॉलीसी कव्हर इतक्या रकमेचे पेमेंट क्लेम पोटी इंश्युरन्स कंपनी कडून पॉलीसी धारकास केले जाते. Money Matters: A Multi-Useful Critical Care Insurance Used in Crisis

    पॉलीसीत साधारणपणे ८ ते ३४ गंभीर आजारांचा समावेश असतो. या पॉलीसीच्या काही अटी असतात. तिची वयोमर्यादा १८ पासून ते ६५ पर्यंत असते. तर इंश्युरन्स.५ लाख ते ५० लाख असतो. पॉलीसी कालावधी १ ते ३ वर्षे असतो. या अटी कंपनी नुसार कमी अधिक असतात जसे कि काही कंपन्या दोन कोटीपर्यंत कव्हर देऊ करतात तर काही कंपनीच्या पॉलीसीत सर्व्हावल पिरीयडची अट नसते. काही कंपन्या सध्या अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी सुद्धा पॉलीसी देऊ करतात. विशेष म्हणजे मिळणारा क्लेम हा पेमेंट स्वरूपाचा असतो. यासाठी हॉस्पिटलमध्ये असण्याची गरज नसते शिवाय उपचारासाठीच्या खर्चाचा तपशीलही देण्याची गरज नसते.

    या उलट मेडिक्लेमसाठी हॉस्पिटलमध्ये किमान २४ तास असणे आवश्यक असते व मिळणारा क्लेम हा सम अस्यूअर्ड व प्रत्यक्षात झालेला खर्च यो दोन्हीतील कमीतकमी रकमे इतकाच असतो. बऱ्याचदा गंभीर आजारावरील उपचार हा दीर्घ काळ करावा लागतो आणि दरवेळी हॉस्पिटलमध्ये जावे लागतेच असे नाही मात्र उपचारावरील खर्च मेडिक्लेम पॉलीसीतून मिळत नाही मात्र रुग्ण आजाराच्या गंभीरपण मुळे कार्यक्षम राहू शकत नाही परिणामी उत्पन्नाचा श्रोत कमी होतो प्रसंगी थांबतो सुद्धा अशा वेळी क्रिटीकल केअर इंश्युरन्स पॉलीसी निश्चितच अर्थीक समस्या सोडविण्यास मदत तर करतेच शिवाय पैश्या अभावी उपचार थांबविण्याची वेळ येत नाही आणि म्हणून क्रिटीकल केअर इंश्युरन्स पॉलीसी घेणे निश्चितच गरजेचे आहे.

    Money Matters : A Multi-Useful Critical Care Insurance Used in Crisis

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग