• Download App
    स्थानिक लॉकडाऊनचाही अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती । Local lockdowns also have a serious impact on the economy, says RBI Governor Das

    स्थानिक लॉकडाऊनचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती

    RBI Governor Das : पतधोरण समितीने सर्वसंमतीने विकास कायम ठेवण्यासाठी समावेशक भूमिका घेऊन महागाई दराला निश्चित दरावर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे आणि आर्थिक विकास टिकविण्याचे लक्ष्य आहे. Local lockdowns also have a serious impact on the economy, says RBI Governor Das


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पतधोरण समितीने सर्वसंमतीने विकास कायम ठेवण्यासाठी समावेशक भूमिका घेऊन महागाई दराला निश्चित दरावर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे आणि आर्थिक विकास टिकविण्याचे लक्ष्य आहे.

    एमपीसीने म्हटले आहे की, 2021 मध्ये अन्नधान्याचे बंपर उत्पादन झाले असून धान्याच्या किमतीत घट दिसून येईल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या संसर्गातील वाढीमुळे आऊटलुक जास्त अनिश्चित झाला आहे. ते म्हणाले की, स्थानिक लॉकडाऊनमुळे मागणी आणि पुरवठ्यात झालेल्या सुधारणांवर परिणाम होऊ शकतो आणि अर्थव्यवस्था नॉर्मल होण्यासाठी आणखी उशीर होऊ शकतो.

    समितीने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे, परंतु लसीकरण मोहिमेमुळे विकासदराला चालना मिळण्याचेही म्हटले आहे.

    तज्ज्ञांच्या मते, महागाईत वाढ, कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि देशातील काही भागांतील स्थानिक लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नाणे निधीने मंगळवारी चीनच्या तुलनेत 2021 मध्ये भारतासाठी 12.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे. याशिवाय जागतिक बँकेच्या वार्षिक स्प्रिंग बैठकीपूर्वीच्या वार्षिक विश्व आर्थिक आऊटलूकमध्ये म्हटलेय की, 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.9 टक्क्यांनी वाढू शकते.

    Local lockdowns also have a serious impact on the economy, says RBI Governor Das

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य