LIC IPO : भारतीय जीवन बीमा निगमच्या आयपीओच्या घोषणेनंतर सर्वांनाच याची उत्कंठा लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार या आयपीओसंदर्भात या महिन्यात इन्व्हेस्टमेंट बँकांकडून प्रस्ताव मागू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येत्या काही आठवड्यांत सरकार यासंदर्भात निमंत्रण पाठवणार आहे. असा विश्वास आहे की, एलआयसी आयपीओसंदर्भात मार्च 2022 पर्यंत निर्णय घेण्यात येईल. LIC IPO may Be Biggest In India, Investment Banks Likely To Submit Proposal this Month
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जीवन बीमा निगमच्या आयपीओच्या घोषणेनंतर सर्वांनाच याची उत्कंठा लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार या आयपीओसंदर्भात या महिन्यात इन्व्हेस्टमेंट बँकांकडून प्रस्ताव मागू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येत्या काही आठवड्यांत सरकार यासंदर्भात निमंत्रण पाठवणार आहे. असा विश्वास आहे की, एलआयसी आयपीओसंदर्भात मार्च 2022 पर्यंत निर्णय घेण्यात येईल.
शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, हा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असेल. चालू आर्थिक वर्षात सरकारने खासगीकरण व निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये ठेवले आहे. यात एलआयसी आयपीओव्यतिरिक्त एअर इंडिया आणि बीपीसीएलच्या विक्रीचा समावेश आहे. जेफरीज इंडियाचे प्रमुख प्रखर शर्मा यांच्या मते, एलआयसीचे मूल्यांकन अंदाजे 261 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 19 लाख कोटी रुपये असू शकते. अशा परिस्थितीत लिस्टिंग झाल्याबरोबरच एलआयसी ही देशातील सर्वात मूल्यवान कंपनी होईल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप जवळपास 199 अब्ज डॉलर्सजवळ आहे.
439 अब्ज डॉलरची मालमत्ता
एलआयसीच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर 2019-20 या आर्थिक वर्षातील त्यांची एकूण मालमत्ता 439 अब्ज डॉलर्स होती. जीवन विमा क्षेत्रात या कंपनीची बाजारातील हिस्सेदारी 69 टक्क्यांच्या जवळ आहे.
जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी आयपीओपूर्वी काही मोठे आर्थिक निर्णय घेत आहे. मार्च तिमाहीत एलआयसीने 8 कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. सार्वजनिक व्यापार असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यातील या कंपनीचा वाटा फक्त 3.66 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, जो आतापर्यंतची सर्वात निम्न पातळी आहे. प्राइम डेटाबेसने ही माहिती दिली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत निफ्टीमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली असून त्यामुळे एलआयसीने मोठा नफा कमावला आहे.
LIC IPO may Be Biggest In India, Investment Banks Likely To Submit Proposal this Month
महत्त्वाच्या बातम्या
- चेन्नईतल्या गावात लसीकरण वाढवण्यासाठी मोफत बिर्यानी अन् बक्षिसांची लयलूट, गावकऱ्यांत लागली चढाओढ
- CBSE च्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला सुखद धक्का, ऑनलाइन मीटिंगमध्ये अचानक एंट्री करून विद्यार्थ्यांशी हितगुज
- आला रे मान्सून आला : केरळात कोसळधार, या वर्षी 101% होणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
- पाटणा येथील एम्समध्ये तीन मुलांना कोव्हॅक्सिनचा लसीचा पहिला डोस ; देशामध्ये चाचण्यांना प्रारंभ
- काँग्रेस मंत्र्यांच्या चमकोगिरीने सरकार पुन्हा पडले तोंडावर, वडेट्टवारांनी लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत घातला गोंधळ, मुख्यमंत्री कार्यालयाने बदलला निर्णय