Inflation : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. अत्यावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाल्याने घराघरातील बजेट पूर्णपणे बिघडलंय. तांदूळ, डाळ, पीठ, खाद्य तेल, चहा पत्ती आणि मिठाची किंमतही एका वर्षभरात वाढली आहे. ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, एक एप्रिल 2020 च्या तुलनेत एक एप्रिल 2021 च्या खाद्य तेलांच्या किमतीत तब्बल 47 टक्के, डाळींच्या किमतीत 17 टक्के आणि खुल्या चहा पत्तीत 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, तांदळाच्या किमतीत 14.65 टक्के, गव्हाच्या पिठाच्या किमतीत 3.26 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, साखर मात्र सध्या तरी स्वस्त आहे. Inflation in edible oil, pulses and rice has broken the backbone of the common man
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. अत्यावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाल्याने घराघरातील बजेट पूर्णपणे बिघडलंय. तांदूळ, डाळ, पीठ, खाद्य तेल, चहा पत्ती आणि मिठाची किंमतही एका वर्षभरात वाढली आहे. ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, एक एप्रिल 2020 च्या तुलनेत एक एप्रिल 2021 च्या खाद्य तेलांच्या किमतीत तब्बल 47 टक्के, डाळींच्या किमतीत 17 टक्के आणि खुल्या चहा पत्तीत 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, तांदळाच्या किमतीत 14.65 टक्के, गव्हाच्या पिठाच्या किमतीत 3.26 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, साखर मात्र सध्या तरी स्वस्त आहे.
खाद्य तेलांच्या किमती किती वाढल्या?
रिपोर्टनुसार, मागच्या एका वर्षात खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पॅक पाम तेल 87 रुपयांवर होते ते आता 121 रुपयांवर गेले आहे., सूर्यफूल तेल 106 वरून थेट 157 रुपये झालंय. वनस्पति तेल 88 हून थेट 121 आणि मोहरीचं तेल 117 वरून 151 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचलं आहे. दुसरीकडे, शेंगदाणे तेल 139 होते ते आता 165 रुपये आणि सोयाबीन तेल 99 वरून थेट 133 रुपये लीटरवर पोहोचले आहे.
चहा आणि दुधातही भाववाढ
खाद्य तेलाशिवाय चहा आणि दुधाच्या किमतीतही भाववाढ झाली आहे. एका वर्षात खुली चहा पत्ती 217 वरून 281 रुपये किलोपर्यंत गेली आहे. चहाच्या किमतीत एकूण 29 टक्के वाढ झाली आहे. मिठाचे भावही एका वर्षात 10 टक्के वाढले आहेत. दुसरीकडे, दूधही 7 टक्के महाग झाल्याचे दिसते. ग्राहक मंत्राल्यावर देण्यात आलेली ही आकडेवारी देशभरातील 135 रिटेल केंद्रांपैकी 111 केंद्रांवरून गोळा करण्यात आली आहे.
डाळींची काय स्थिती?
ताज्या आकडेवारीनुसार, तुरीची डाळ साधारण 91 रुपये किलोवरून आता 106 रुपये किलोवर गेली आहे. उडदाची डाळ 99 वरून 109, मसूर डाळ 68 वरून 80 रुपये प्रति किलोपर्यंत गेली आहे. मूग डाळही 103 ते 105 रुपये किलोवर गेली आहे.
Inflation in edible oil, pulses and rice has broken the backbone of the common man
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझे यांना छातीत वेदना आणि हार्ट ब्लॉकेजचा त्रास, NIA कोर्टाने म्हटले, मेडिकल रिपोर्ट दाखवा..
- सभेतील भाषणादरम्यान बेशुद्ध झाला कार्यकर्ता, पंतप्रधान मोदींनी मदतीसाठी पाठवली डॉक्टरांची टीम
- मोदी – शहांची काल रात्री बंगालबाबत आढावा बैठक झाली; त्यांना समजून चुकलंय बंगालमध्ये तृणमूळ जिंकतेय; डेरेक ओब्रायन यांची “गोपनीय माहिती”
- नवी कौशल्ये शिका, अन्यथा 2025 पर्यंत 10 पैकी 6 जणांची जाईल नोकरी, World Economic Forum चा अहवाल
- रॉकेटरी – थलायवीचे ट्रेलर लाँचचे टायमिंग आणि मोदींची भाषणे काय सांगतात??