• Download App
    सुरक्षित गुंतवणुकीचा फंडा ओळखा Identify a safe investment fund

    सुरक्षित गुंतवणुकीचा फंडा ओळखा

    कमाई अशा ठिकाणी गुंतवली पाहिजे जिकडे सर्वाधिक परतावा मिळेल तसंच ही गुंतवणूक सुरक्षितही असेल. या गुंतवणुकीवर लागणाऱ्या करावरही लक्ष देणं गरजेचं असतं. या पाच ठिकाणी गुंतवणूक केल्याने नक्की फायदा होवू शकतो. सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी योजना असून पूर्णपणे सुरक्षित आहे. १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर बँक किंवा पोस्टामध्ये खातं उघडलं जाऊ शकतं. या योजनेमध्ये गुंतवणुकीचा काळ १४ वर्ष आहे. Identify a safe investment fund

    मुलगी २१ वर्षांची झाल्यावर गुंतवणूक मॅच्युअर होते. या योजनेतील गुंतवणुकीमुळे आयकरात सूट मिळू शकते. या योजनेमध्ये ८.१ टक्के व्याजदर मिळतो. व्याजाची गणना कपाऊंड होत असल्यामुळे परतावाही जास्त मिळतो. या योजनेमध्ये वर्षाला कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. दुसीर योजाना पीपीएफ.



    पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेवर मिळणारं व्याज टॅक्स फ्री आहे. एवढच नाही तर मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कमही टॅक्स फ्री असते. पीपीएफवर सध्या वर्षाला ७.६ टक्के व्याज मिळतं. प्रत्येक ३ महिन्यांनंतर पीपीएफच्या व्याजाची समीक्षा होते. पीपीएफमध्ये वर्षाला कमीतकमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

    तिसरा पर्याय म्हणजे लिक्विड फंड. यात बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळतं. हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या गुंतवणुकीमध्ये धोका कमी असतो तसच लॉक ईन पिरेड नसल्यामुळे गुंतवणुकीच्या दुसऱ्या दिवशीही पैसे काढता येतात. चौथा प्रकार पोस्ट ऑफीस. बँकेमधले व्याजदर कमी होत असतानाच पोस्टातल्या योजनांचे व्याज दरांमध्ये मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

    बँकेमध्ये सध्या ६ ते ७ टक्के व्याज मिळत असताना पोस्टामध्ये ७.९ टक्के व्याज मिळत आहे. यामुळे ९ वर्षांमध्ये तुमची रक्कम दुप्पट होते. बँकांमध्ये जास्तीत जास्त ७ टक्के व्याज मिळत असताना सरकारी बॉण्ड्समधून ७.८ टक्के व्याज मिळत आहे. त्यामुळे बँकेच्या तुलनेत सरकारी बॉण्ड्समधील गुंतवणूक लवकर दुप्पट होते.

    Identify a safe investment fund

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग