• Download App
    गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्ती वाढ । Gautam Adani becomes Second Richest Man in Asia according to Bloomberg billionaires index

    गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ

    Gautam Adani : भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनच्या झोंग शानशान यांची जागा घेतली आहे. Gautam Adani becomes Second Richest Man in Asia according to Bloomberg billionaires index


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनच्या झोंग शानशान यांची जागा घेतली आहे.

    गत महिन्यात अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती, ज्यामुळे गौतम अदानींची संपत्ती वाढून ते आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले. गौतम अदानी यांनी ब्लूमबर्गच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये 14 वे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी 13व्या स्थानावर आहेत.

    गौतम अदानी यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स

    ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी अदानींच्या संपत्तीत सुमारे 32.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानींच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 76.5 अब्ज डॉलर्स आहे. त्याच वेळी चीनची झोंग शशान यांची एकूण संपत्ती 63.6 अब्ज डॉलर्स आहे.

    जागतिक श्रीमंतांत बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर

    फेब्रुवारी महिन्यात मुकेश अंबानी यांनी चीनची शानशान यांना मागे टाकले होते. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. 2021च्या सुरुवातीच्या महिन्यांत शानशान यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या श्रेणीमध्ये सहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले होते.

    त्याच वेळी ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्सनुसार, मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांची एकूण मालमत्ता 141 अब्ज डॉलर्स असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे मार्क झुकरबर्क पाचव्या क्रमांकावर दिसत आहेत.

    Gautam Adani becomes Second Richest Man in Asia according to Bloomberg billionaires index

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत