Tuesday, 13 May 2025
  • Download App
    कोरोना महामारीतही अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ, जीएसटीतून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न Despite Corona epidemic also increased indirect tax collection, higher than expected revenue from GST

    कोरोना महामारीतही अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ, जीएसटीतून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न

    कोरोना महामारीमुळे देशात अनेक दिवस लॉकडाऊन लावावा लागला. त्याचा उद्योग-व्यापारांवर परिणाम झाला. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारचा महसूल कमी होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात कोरोना काळातही जीएसटी संकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. एकूण अप्रत्यक्ष कर संकलन त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १२ टक्यांनी वाढले आहे. Despite Corona epidemic also increased indirect tax collection, higher than expected revenue from GST


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशात अनेक दिवस लॉकडाऊन लावावा लागला. त्याचा उद्योग-व्यापारांवर परिणाम झाला. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारचा महसूल कमी होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात कोरोना काळातही जीएसटी संकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. एकूण अप्रत्यक्ष कर संकलन त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १२ टक्यांनी वाढले आहे.

    गेल्या आर्थिक वर्षात जीएसटी संकलन अपेक्षेपेक्षा जास्त (१०६ टक्के) झाले आहे. कोरोनामुळे केंद्राचे जीएसटी संकलन घटून ५.१५ लाख कोटी रुपये एवढे राहण्याचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ५.४८ लाख कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला आहे. मात्र, २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जीएसटी संकलन कमीच झाले आहे.

    त्यावर्षी ५.९९ लाख कोटी जीएसटी प्राप्त झाला होता. ही घट कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनमुळे झाली आहे. अप्रत्यक्ष कर संकलनही गेल्या आर्थिक वर्षात १२ टक्के वाढले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्राला १०.७१ लाख कोटी रुपये अप्रत्यक्ष करांच्या स्वरूपात प्राप्त झाले. यात जीएसटी, सीमाशुल्क इत्यादींचा समावेश आहे. सरकारच्या अपेक्षेच्या तुलनेत १०८ टक्के संकलन झाले आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हे संकलन ९.५४ लाख कोटी रुपये होते.



    केंद्र सरकारला सीमा शुल्काच्या स्वरुपात मिळणारा महसूल २१ टक्क्यांनी वाढून १.३२ लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हा आकडा १.०९ लाख कोटी रुपये एवढा होता. तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा करांच्या थकबाकीचे ३.९१ ला रुपयेदेखील प्राप्त झाले आहेत.

    देशात लॉकडाऊन लावल्यावर अर्थव्यवस्थेत मंदी आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाला. त्याचबरोबर पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या नाºयामुळे देशी उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचा परिणाम म्हणनू करसंकलनात देशाने चांगली कामगिरी केली आहे.

    Despite Corona epidemic also increased indirect tax collection, higher than expected revenue from GST


    विशेष बातम्या

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग