कोरोनाच्या महामारीचा फटका बसून अमेरिेकतील दोन लाखांवर व्यवसायांना बसल्यामुळे ते बंद पडले आहेत. मात्र, सुरूवातीला अंदाज व्यक्त केल्यापेक्षा ही संख्या खूप कमी असल्यामुळे त्याचा बेरोजगारीवरील परिणाम तुलनेने कमी झाला आहे. Corona hits two million industries in the US, but less than estimated
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोनाच्या महामारीचा फटका बसून अमेरिेकतील दोन लाखांवर व्यवसायांना बसल्यामुळे ते बंद पडले आहेत. मात्र, सुरूवातीला अंदाज व्यक्त केल्यापेक्षा ही संख्या खूप कमी असल्यामुळे त्याचा बेरोजगारीवरील परिणाम तुलनेने कमी झाला आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या वर्षात अमेरिकेतील बहुतांश उद्योग व्यवसायांना फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामध्ये छोट्या व्यवसायांचे प्रमाण मोठे होते. त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
यामध्ये केशकर्तनालये, नेल सलून्स यासारख्या ग्राहकांशी निकटचा संबंध येणाऱ्या व्यवसायांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे.
आकडवारीनुसार अमेरिकेत दरवर्षी सरासरी सहा लाख उद्योग अपयशी ठरतात, असे मध्यवर्ती बॅकेंच्या अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र, तरीही महामारीच्या अभ्यासातून आर्थिक दृष्टया आशादायी चित्र पुढे आले आहे. याचे कारण म्हणजे दरवर्षी अमेरिकेत सरासरी सहा लाख व्यवसाय अपयशी ठरतात.
सेवाक्षेत्रातील हॉटेल, भाजीदुकाने आणि मनोरंजन कंपन्यांना यांना बसलेला फटका तुलनेने कमी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र, इतर बहुतांश उद्योगांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.
मात्र, अमेरिकेतील अर्थव्यवस्था अंदाज केल्यापेक्षा जास्स्त गतीने रुळावर येत आहे. याचे कारण म्हणजे महामारीमुळे स्थायी स्वरुपाचे नुकसान फार झालेले नाही. सुरूवातील व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अमेरिकेतील चार लाख छोट्या उद्योगांना कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता होती.
Corona hits two million industries in the US, but less than estimated
महत्वाच्या बातम्या वाचा
- भारताचे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन विवेक यांचे तमिळनाडूत निधन
- क्युबामधील तब्बल सहा दशकांच्या कॅस्ट्रो युगाची अखेर, राऊल कॅस्ट्रो यांचा राजीनामा
- निवडणूक काळात तमिळनाडूत पकडली ४४६ कोटींची दारू; तर पाच राज्यांत हजार कोटींचा ऐवज जप्त!
- देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत
- दिल्ली आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय लोकदल उभारणार स्मारक