CBDT Extends Income tax compliance deadline : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) शनिवार एक मोठा निर्णय घेत टीडीएस जमा करण्याचा आणि उशिराने टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. CBDT ने हा निर्णय वाढलेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. CBDT Extends Income tax compliance deadline, amid covid surge, Read Details here
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) शनिवार एक मोठा निर्णय घेत टीडीएस जमा करण्याचा आणि उशिराने टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. CBDT ने हा निर्णय वाढलेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. CBDT कडून जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार, प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्याची, आयुक्तांकडे अपील करण्याची आणि विवाद समाधान पॅनलच्या आदेशांवर आक्षेप नोंदवण्यास अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.
निवेदनानुसार, करदाता 1 एप्रिल किंवा त्यानंतर टीडीएसला मेच्या अखेरपर्यंत कायद्यातील उल्लेखित तारखांच्या आत किंवा जारी केलेल्या नोटिशीत जेही नंतर येते, तोपर्यंत जमा करू शकतात. याशिवाय मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी उशिराने टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा आणि संशोधित रिटर्न, जे 31 मार्च 2021 ला किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक होते, त्यासाठी आता 31 मे 2021 पर्यंत अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.
31 मेपर्यंत मुदतवाढ
प्राप्तिकर अधिनियम मूल्यांकनकर्त्यांना मूळ रिटर्नमध्ये काही चूक किंवा चुकीचा तपशील शोधला तर मूल्यांकन वर्षाच्या अखेरपर्यंत कर निर्धारण पूर्ण करण्याआधी संशोधित रिटर्न दाखल करण्याची अनुमती देतो. संपत्ती खरेदी-विक्रीत पैसे देणाऱ्या व्यक्तींकडून टीडीएस जमा करण्यासाठी नियत तारीख आता 30 एप्रिल ऐवजी वाढवून मई अखेरपर्यंत करण्यात आली आहे.
संपत्तीच्या खरेदी विक्रीत 1 टक्के आणि 50,000 रुपयांहून अधिक किरायाच्या देयकात 5 टक्के टीडीएस जमा करावा लागतो. सीबीडीटीने म्हटले की, त्यांना करदात्यांना, सल्लागारांना आणि इतर हितधारकांकडून नियत तारखांमध्ये सूट मिळण्यासाठी अनेक विनंत्या आल्या आहेत, यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
CBDT Extends Income tax compliance deadline, amid covid surge, Read Details here
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे 6441 मेट्रिक टन डाळ शिल्लक, गरिबांना त्वरित वितरित करण्याचे केंद्राचे आदेश
- महाराष्ट्रात लसीकरणासाठी गेलेल्या 18+ वयोगटाची निराशा, अजित पवार म्हणाले – 45 वर्षांपुढील लोकांसाठीही लसीचा साठा नाही
- पळपुट्या नीरव मोदीकडून भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी प्रयत्न सुरूच, इंग्लंडच्या हायकोर्टात केले अपील
- Corona Crisis : देश भयंकराच्या दारात, पहिल्यांदाच 24 तासांत 4 लाखांहून जास्त रुग्णांची नोंद, तर 3523 मृत्यूंची नोंद
- कोरोना संकटात केंद्र सरकारकडून मोठी मदत, 8873 कोटींचा पहिला हप्ता राज्यांना जाहीर