• Download App
    मनी मॅटर्स : अतिरिक्त खर्चावर लक्ष ठेवणारे अ‍ॅप्स... Apps that track additional costs.

    मनी मॅटर्स : पैशांच्या बचतीला द्या तंत्राची जोड

    प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा आल्यावर तो उधळण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांना होत असते. Apps that track additional costs.

    भविष्यासाठी पैसा जपून ठेवावा असे त्याला वाटते मात्र त्याच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. पैशाची बचत कशी करावी याचे मार्गदर्शन करणारी ढीगभर पुस्तके जगभरात आहेत. मात्र सध्या मोबाइलच्या जमान्यात प्रत्येक बाब सहजसोपी करून दिली जात आहे. त्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स तयार केले जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर बनले आहे.

    पैशाची उधळपट्टी करणा-यांवर वचक ठेवणारे नवीन अ‍ॅप्स तयार झाले आहे. हे अ‍ॅप्स महिन्याचे तुमचे अंदाजपत्रक तयार करणार असून उधळपट्टीला लगाम लावणार आहे. हॅलो वॉलेट असे अ‍ॅप्सचे नामकरण केले आहे. तुम्ही कोणताही खर्च केल्यास हे अॅप अप्लिकेशन तुम्हाला त्याची तातडीने जाणीव करून देईल. तुमचा खर्च कोणत्या बाबींवर होतो याची माहिती देणार असून तो कसा कमी करावा, याचे निर्देश देईल.

    तुमचे आर्थिक लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीनेही अ‍ॅप्स फायदेशीर ठरणार आहे. यात तुमचे उत्पन्न, बचत, क्रेडिट कार्ड, आरोग्य, गुंतवणूक आदींचा तपशील असेल, असे कंपनीने तिच्या वेबसाइटवर सांगितले. हे अ‍ॅप्स तुमच्या बॅँकेशी संलग्न असून तुमच्या सर्व खर्चाचे विश्लेषण करणार आहे. तुमचा खर्च हाताबाहेर चालला असल्यास तात्काळ तुम्हाला जागृत करणार आहे. तसेच यामधील विशेष बाब म्हणजे, कर्जावरील व्याज आणि अन्य शुल्क कमी करण्यातही ते मदत करणार आहे.

    Apps that track additional costs.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग