• Download App
    महिन्याचा घरखर्चाचेही नीट कॅलेंडर बनवा Also make a monthly calendar of household expenses

    महिन्याचा घरखर्चाचेही नीट कॅलेंडर बनवा

    Also make a monthly calendar of household expenses

    पैसे ही आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच जगात अनेक गोष्टीचे मोल कमी झाले तरी पैशाचे मोल मात्र कमी झालेले नाही. सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी किमान पैशांची गरज लागतेच. पगारदार असो, शेतकरी असो की कष्टकरी, उद्योगपती असो कि डॉक्टर, इंजिनियर. प्रत्येकाला त्याच्या गरजांनुसार, कुटुंबानुसार पैसा लागतोच. Also make a monthly calendar of household expenses

    प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धती किंवा मार्ग वेगवेगळे असले तरी काही किमान चांगले जीवन जगण्यासाठी प्रत्येकालाच पैसा लागतो. अशा वेळी केवळे पैसे मिळवणेच महत्वाचे नसते तर मिळालेला पैसा योग्य प्रकारे खर्च करणे देखील तितकेच महत्वाचे असते.

    पैशांचा योग्य प्रकारे व काटकसरीने वापर केल्यास हाच वाचलेला पैसा तुम्हाला संकटाच्या काळी देवासारखा धावून येतो. त्यामुळे ज्या प्रमाणे विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती त्याचप्रमाणे पैशांची बचत हे एकप्रकारे पैसे मिळवण्यासारखेच असते. वर्षांच्या कॅलेंडरप्रमाणे आपणही आपले वर्षभरातील खर्चाची आखणी करायला हवी. जसे प्रत्येक महिन्यात महत्वाचे दिवस, सण असतात.

    तसेच आपणही कुटुंबियासमवेत एकत्र बसून साधारण या वर्षांत कोणते मोठे खर्च करावे लागणार आहेत हे कॅलेडंरवर लिहा. म्हणजे दसरा, दिवाळीसारख्या सणाला कोणती वस्तू खरेदी करायचा बेत आहे का, लग्नसराईच्या दिवसात कोणा नातेवाईकाचे लग्न आहे, त्यासाठी भेट द्यावी लागणार आहे का, कोणत्या महिन्यात प्रवासासाठी खर्च करावा लागणार आहे, सुटीच्या मे किंवा डिसेंबर महिन्यात ट्रीपला जाण्याचा बेत आहे की, कोणत्या महिन्यात मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, विम्याचा वार्षिक हप्ता कोणत्या महिन्यात जाणार आहे, मेडिक्लेमची रक्कम कधी द्यायची आहे. अशा गोष्टींसाठी मोठा खर्च करावा लागतो.

    महिन्याच्या नेहमीच्या घर खर्चाशिवाय त्यासाठी रक्कम काढावी लागते. पण त्यासाठी योग्य कॅलेंडर तयार केल्यास ताण येत नाही. समजा विम्याच्या हप्ता 24 हजारांचा असेल तर त्यासाठी दरमहा दोन हजारांचे रिकरिंग सुरु करायचे. वर्षाच्या शेवटी त्यावर व्याजही मिळते व एकरकमी पैसे भरताना अडचण येत नाही. पण हे कधी शक्य होते ज्यावेळी आपण खर्चाचे कॅलेंडर बनवू तेव्हाच.

    Also make a monthly calendar of household expenses

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग