• Download App
    Also check yourself when spending on education for children

    मुलांवर शिक्षणासाठी खर्च करताना स्वतःलादेखील तपासा

    सध्या परदेशात शिकायला जाणे आवश्यक बाबा मानली जात आहे. यावर मध्यमवर्गीयांच्या घरातही चर्चा सुरू असते. परदेशातील चांगल्या विद्यापीठात उच्च शिक्षण घ्यायचे झाल्यास त्यासाठी मोठा खर्च येतो. अशा वेळी शिक्षणाशिवाय खर्च टाळण्यावर मुलांनी व पालकानी भर दिला पाहिजे. परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलांना आपल्याला परवडेल इतकाच प्रासंगिक खर्च करण्याची मर्यादा निश्चित असणे गरजेचे आहे. मग परदेशी शिक्षणासाठी गेलेली मुले इतके पैसे या कारणासाठी पाठवा, अशी ईमेल ते पुन्हा करणार नाहीत. परदेशी शिक्षणाची उपलब्ध झालेली संधी हे ज्ञानसंपादन करण्यासाठी आहे आणि त्यासाठी खर्च होणारा पैसा हा माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्ती पश्चात उदरनिर्वाहासाठी असलेल्या पैशातून झाला आहे, हे मुलास हे शिकवावे लागेल. Also check yourself when spending on education for children

    त्यावेळी मुलासमोर स्पर्धा जिंकल्याचा आव न आणता बदलत्या परिस्थितीमुळे कुटुंबाने आपल्या काही गरजा दूर सारल्या आहेत, याची जाणीव वारंवार करून द्यावी लागेल. ही वारंवारता व्यक्तीसापेक्ष बदलेल. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण प्रौढांसाठी आर्थिक जबाबदारी मुख्यत्वे खर्च करण्याच्या स्वातंत्र्याविषयी असते. त्यांनी स्वत:ला ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून त्यांना अपेक्षित असलेले जीवन ते जगू शकतील. या प्रक्रियेत पालकांना म्हटले तर बरेच करण्यासारखे असते आणि म्हटले तर बरेच काही समजावून सांगण्यापलीकडचे असते. काय करायचे हा शोध वैयक्तिक आणि मुलांचा स्वत:चा आहे, मुले कोणत्या जगात राहतील हे माहीत नसताना पैसे उपलब्ध करून देण्यापलीकडे फारसे आपल्या हातात काही नसते. सध्या दोघे कमावणारे आणि एकच मूल असल्याने बऱ्याच पालकांना मुलाने मागितलेल्या गोष्टी परवडतात.

    पालकांच्या अशा वर्तणुकीमुळे मुलांना त्यांची मागणी हा जन्म दिल्याने मिळालेला हक्क असल्यासारखी वर्तणूक असते. समंजस पालकत्व निभावताना मुलांना स्वत:च्या मागण्यांसाठी करायची तरतूद अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पर्यायांनी करू देण्यावर मुलांचे आर्थिक वर्तन निश्चित होत असते. जबाबदार आर्थिक वर्तन होण्यासाठी आपल्या मुलांना आपणच तयार करायचे असते.

    Also check yourself when spending on education for children

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग