• Download App
    मनी मॅटर्स : अज्ञान, भीती, संयमाचा अभाव हेच गुंतवणुकीतील खरे अडथळे। Money Matters : Ignorance, fear, lack of restraint are the real barriers to investing

    मनी मॅटर्स : अज्ञान, भीती, संयमाचा अभाव हेच गुंतवणुकीतील खरे अडथळे

    आपण गुंतवणुक का करत नाही? हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर येते की अज्ञान, भीती, संयमाचा अभाव. या तिन्ही गोष्टीवर काम करणे गरजेचे असते. अज्ञान फक्त याचे नाही कि मी गुंतवणुक कशी करू, तर मी गुंतवणुक का करू? आपल्याला दिसून येईल कि योग्य गुंतवणुकीचा किती फायदा होतो. १०,००० रुपये कपाटात ठेऊन फक्त १०,००० च राहिले तर त्याचा काही फायदा नसतो. महागाईमुळे त्यांची किमत पण कमी झाली असती. पण ते गुंतवले असते तर पहा किती फायदा झाला असता. Money Matters : Ignorance, fear, lack of restraint are the real barriers to investing

    गुंतवणुक करण्यात आणखी एक अडचण म्हणजे भीती. भीती कि माझ्याकडे जे पैसे आहे ते पण मी गमवून बसेल. ज्ञान असेल तर भीती नाहीशी होते. भीती वाटत असेल तर गुंतवणुक करू नका आणि भीती वाटते म्हणून तसेच बसून पण राहू नका. ज्ञानार्जन करा. स्वतः शोधा तुम्हाला हि माहिती कुठे मिळेल? शाळेचा पहिला दिवस आठवा. जवळपास सर्वच रडतात, भीतीमुळे कि आपण कोणत्या ठिकाणी आलो ? इथे काय होईल ? आपल्याला काही दुखः मिळेल का इथे? हे कोण लोक आहेत ? वगैरे वगैरे. म्हणजे पुढे काय होईल याची भीती वाटते.

    गुंतवणुक करताना पण हीच भीती वाटते. पुढे काय होईल माझ्या पैश्याचं ? पण जस जस आपण शाळेत जात जातो आपली हि भीती हळू हळू नाहीशी होत जाते. कोणी कॉलेज मध्ये जाऊन रडते का? मग तसेच गुंतवणुक करता करता तुम्ही शिकू लागाल आणि तुमची भीती नाहीशी होईल. भीती वाटते म्हणून सुरूच करणार नाही हे सोडून द्या. लहान सुरवात करा. अश्या रक्कमेने सुरवात करा जी गमावली तरी तुम्हाला फरक पडणार नाही. यातून भिती दूर होण्यास मदत होईल.

    Money Matters : Ignorance, fear, lack of restraint are the real barriers to investing

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग