• Download App
    अर्थव्यवस्था कात टाकतेय, नोकरदारांसाठी अच्छे दिन, २०२२ मध्ये मिळणार सरासरी ९.४ टक्के वेतनवाढ|Economy is booming, good days for employees, average pay rise of 9.4 per cent in 2022

    अर्थव्यवस्था कात टाकतेय, नोकरदारांसाठी अच्छे दिन, २०२२ मध्ये मिळणार सरासरी ९.४ टक्के वेतनवाढ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर साठलेले मळभ दूर होऊ लागले आहे. त्यामुळे आर्थिक पातळीवर अनेक चांगल्या बातम्या येत आहेत. नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी असून २०२२ मध्ये सरासरी ९.४ टक्के वेतनवाढ होण्याचा अंदाज एओएनच्या वार्षिक अहवालात नोंदविण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वात मोठी वेतनवाढ असेल.Economy is booming, good days for employees, average pay rise of 9.4 per cent in 2022

    एओएनच्या वार्षिक वेतन सर्वेक्षणानुसार २०२२ मध्ये पगारात सरासरी ९.४ टक्के वाढ होईल. याचे कारण म्हणजे ग्राहक पुन्हा एकदा खरेदीकडे वळला असून आता कंपन्यांमध्ये टॅलेंट हंट सुरू झाले आहे. गेल्या सहा वर्षात २०२८ चा अपवाद वगळला तर ही सर्वाधिक वेतनवाढ आहे. २०२१ मध्ये सरासरी वेतनवाढ ही ८.८ टक्के आहे. ही वेतनवाढ ७.७ टक्के अपेक्षित धरली होती. मात्र, सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही सरसकट लॉकडाऊन केला नाही. कंपन्यांनीही दुसऱ्या लाटेचा यशस्वीपणे मुकाबला केला. तसेच आर्थिक वृध्दीचेआपले लक्ष्य साध्य केले.



    या अहवालात ३९ कंपन्यांमधील १३०० कंपन्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. यामध्ये म्हटले आहे की आर्थिक पातळीवर पुन्हा एकदा मजबुती दिसत असून ग्राहकांचा विश्वासही परत आला आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी कंपन्या अर्थातच सर्वाधिक वेतनवाढ देणार आहे. आयटी कंपन्यांतील वेतनवाढ ही ११.२ टक्के असेल.व् त्यानंतर व्यावसायिक सेवा आणि ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या कर्मचाºयांना १०.६ टक्के वेतनवाढ देण्याचा अंदाज आहे.

    2021 मध्ये रिअल इस्टेट सारखे क्षेत्र पिछाडीवर गेले होते. मात्र, यामध्येही ८.८ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. रेस्टॉरन्ट क्षेत्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र, या क्षेत्रातही ७.९ टक्के वेतनवाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.

    अहवालात म्हटले आहे की दोन आकडी वेतनवाढ ही गेल्या दहा वर्षांत प्रथमच होणार आहे. गुणवंत कर्मचाऱ्यांसाठी होणारी खेचाखेच पुन्हा एकदा सुरू होणार असून प्रतिभाशालींना चांगले दिवस येणार असल्याचे एऑनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठी यांनी सांगितले.

    २०२१ साली कोरोनाच्या महामारीमुळे अनेक क्षेत्रांत तणावाचे वातावरण होते. मात्र, या क्षेत्रांमध्येही २०२२ मध्ये आशावादी वातावरण तयार झाले आहे. त्याचा फायदा नोकरदारांना होऊन त्यांच्या पगारात वाढ होईल. बहुतेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक भावना आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. त्याचबरोबर ग्राहकांकडून मागणीही वाढत असल्याचे सेठी यांनी सांगितले.

    Economy is booming, good days for employees, average pay rise of 9.4 per cent in 2022

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य