विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अतिवरिष्ठ, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पहिला दणका देऊन 8 राज्यांचे गृहसचिव बदलले. त्यांच्या पाठोपाठ पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक बदलून टाकले. महाराष्ट्रातल्या 11 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आता त्यापुढे जाऊन निवडणूक आयोगाने गुजरात पंजाब ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधल्या जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. ECI shakes up district administration in five states, transfers non-encadred DMs & SPs
निवडणूक आयोगाने (ECI) गुजरात, पंजाब, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी (DM) आणि पोलीस अधीक्षक (SP) या नेतृत्वाच्या पदांवर नियुक्त केलेल्या बिगर-संवर्गीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. जिल्ह्यातील डीएम आणि एसपी ही पदे अनुक्रमे भारतीय प्रशासकीय आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांसाठी आहेत.
गुजरातमधील छोटा उदयपूर आणि अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्याचे एसपी, पंजाबमधील पठाणकोट, फाजिल्का, जालंधर ग्रामीण आणि मालेरकोटला जिल्ह्यांचे एसएसपी, ओडिशातील ढेंकनालचे डीएम, देवगड आणि कटक ग्रामीणचे एसपी आणि पश्चिम बंगालच्या पूर्वा मेदिनीपूर, झारग्राम, पूर्व वर्धमान आणि बीरभूम जिल्ह्याचे डीएम. यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने काढले.
याव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाने सर्वांत महत्त्वाची कार्यवाही पंजाबमध्ये केली. तिथे राजकीय पक्षांशी संबंधित आणि लोकप्रतिनिधींचे नातेसंबंध असणारे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. पंजाबमधील भटिंडाचे एसएसपी आणि आसाममधील एसपी सोनितपूर यांची बदली करण्याचे निर्देश दिले.
ECI shakes up district administration in five states, transfers non-encadred DMs & SPs
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावर केंद्राचे उत्तर; पॅनेलमध्ये सरन्यायाधीश असणे म्हणजेच आयोग स्वतंत्र असे नाही
- राजकीय पक्षांच्या मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
- सुरुवातीला पवार गटाची चलती, आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांची कुरघोडी; युगेंद्र पवारांना घेराव!!
- EDने पंजाबमधील तुरुंगात असलेल्या AAP आमदारासह सहा जणांविरुद्ध दाखल केली फिर्याद