• Download App
    EC that by-polls cannot be held at this time. If there is such situation, why are municipal corporation polls pending for 2.5 years

    … मग महापालिका निवडणुका अडीच वर्षे रेंगाळत का ठेवल्यात??; बंगालमध्ये पोटनिवडणूक वादात तृणमूळ काँग्रेस – भाजप आमने-सामने

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यासाठी तृणमूल काँग्रेस अतिशय उतावीळ झाली आहे, कारण त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पद वाचवायचे आहे. परंतु निवडणूक आयोग पोटनिवडणूक घेण्यास कोरोनामुळे तयार नाही. EC that by-polls cannot be held at this time. If there is such situation, why are municipal corporation polls pending for 2.5 years

    या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपचे नेते आमने – सामने आले आहेत. गेली अडीच वर्षे महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका तृणमूल काँग्रेसने रेंगाळत का ठेवल्यात? आणि आता कोरोना असताना त्यांना पोटनिवडणुका का घ्यायच्या आहेत?, असा सवाल भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकीय अडवणूक करण्यासाठीच निवडणूक आयोगाचा हत्यारासारखा वापर करून भाजप पश्चिम बंगाल विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचे टाळत आहे, असा आरोप तृणमूळ काँग्रेसचे नेते तपस राय यांनी केला आहे.

     

    विधानसभेची पोटनिवडणूक घ्यायची का नाही याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. तृणमूळ काँग्रेस त्यासाठी आक्रमक आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थका मार्फत कोलकत्ता हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे.

    या पार्श्वभूमीवर तृणमूळ काँग्रेस आणि भाजप यांच्या शाब्दिक खडाजंगी सुरू आहे. ममतांचे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी पोटनिवडणुकीचा आग्रह धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसला म्हणूनच भाजपने रोकडा सवाल केला आहे, की गेली अडीच वर्षे पश्चिम बंगालमधल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका तुमच्या सरकारने रेंगाळत का ठेवल्यात? त्या का घेतल्या नाहीत?, या प्रश्नाचे उत्तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप दिलेले नाही.

    EC that by-polls cannot be held at this time. If there is such situation, why are municipal corporation polls pending for 2.5 years

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार