• Download App
    Bhagwant Mann दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पैसे वाटपाचा खेळ; तर आम्ही मजबुतीने निवडणूक लढवतोय, काँग्रेसवर सांगायची वेळ!!

    दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पैसे वाटपाचा खेळ; तर आम्ही मजबुतीने निवडणूक लढवतोय, काँग्रेसवर सांगायची वेळ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पैसे वाटपाचा खेळ, तर आम्ही मजबुतीनेच निवडणूक लढवतोय असे सांगायची काँग्रेसवर वेळ!! हा आजच्या दिवसभरातले दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

    “पंजाब सरकार” असे लिहिलेली पैशांनी भरलेली कार कालच दिल्लीच्या रस्त्यावर आढळल्याने दिल्लीत पैशाची एन्ट्री झाली. त्या पाठोपाठ आम आदमी पार्टीने पैसे वाटपाचा खेळ सुरू केल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या वेब पोर्टलवर आणि ॲपवर आली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दिल्ली पोलिसांना हाताशी धरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या कपूरथला हाऊस इथे जाऊन ताबडतोब तपास सुरू केला. मात्र हा छापा नव्हता, असा खुलासा नंतर निवडणूक आयोगाने केला, पण त्याबरोबर आम आदमी पार्टीने भाजप पैसे वाटतोय ते निवडणूक आयोगाला दिसत नाही पण आमच्या घरांवर मात्र छापे मारत आहेत असा आरोप केला.

     

    मात्र काँग्रेस दिल्ली निवडणूक ढिल्ली पडली. काँग्रेसचे केंद्रीय नेते निवडणुकीतल्या पराभवाची भीती बाळगून प्रचारात उतरले नाहीत, असे पर्सेप्शन तयार व्हायला लागल्याबरोबर राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्यासारखे नेते दिल्लीच्या प्रचारात उतरले. त्यांनी काही ठिकाणी जाहीर सभा आणि रोड शो आयोजित केले. दिल्लीची निवडणूक आम्ही मजबुतीने लढवतोय. गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेस विरोधी पक्षांमध्ये राहिली. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात केजरीवाल सरकार होते. त्यांनी जनतेसाठी काय केले, हेच तर सवाल मी मजबुतीने उभे राहून विचारतोय, असा खुलासा सचिन पायलट यांनी केला.

    दरम्यानच्या काळात आम आदमी पार्टीचे नेते यमुना नदीचे अमोनिया मिश्रीत पाणी घेऊन भाजपच्या कार्यालयावर पोचले होते. परंतु तिथे त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्या उलट भाजपचे नेते प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल भ्रष्ट असल्याचा भला मोठा बलून दिल्लीच्या हवेत सोडला. त्यामुळे आम आदमी पार्टीचे नेते केवळ आंदोलनाचे फोटोसेशन उरकून आपापल्या प्रचाराच्या दौऱ्यांवर निघून गेले. अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी एकत्रित रोड शो केला.

    EC denies Atishi’s claim of raid on Bhagwant Mann’s Delhi residence

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते