• Download App
    ममतादीदी, तुमच्या चिथावणीमुळेच कुचबिहारमध्ये चौघांना प्राण गमवावे लागलेत; पण भाजप कार्यकर्त्याच्या हत्येविषयी तुमचे डोळे नाही पाणावले; अमित शहांचे प्रत्युत्तर | Earlier, Didi encouraged youngsters & women to come forward & gherao CAPF. You said & left on your wheelchair. But because of you, 4 people died there

    ममतादीदी, तुमच्या चिथावणीमुळेच कुचबिहारमध्ये चौघांना प्राण गमवावे लागलेत; पण भाजप कार्यकर्त्याच्या हत्येविषयी तुमचे डोळे नाही पाणावले; अमित शहांचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था

    बशीरहाट दक्षिण – कुचबिहारमधील सीतलाकुचीत निवडणूक हिंसाचाराला आणि चौघांच्या मृत्यूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याला आज अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Earlier, Didi encouraged youngsters & womento come forward & gherao CAPF. You said & left on your wheelchair. But because of you, 4 people died there

    बशीरहाट पश्चिममधील जाहीर सभेत अमित शहा म्हणाले, की ममतादीदी तुम्ही कुचबिहारला आलात. तरूणांना आणि महिलांना सीएपीएचा अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांचा घेराव करायची चिथावणी दिलीत आणि व्हिलचेअरवर बसून निघून गेलात. त्याचा दुष्परिणाम असा झाला की युवकांनी खरेच सीएफीएफ जवानाला घेराव घातला. त्याची रायफल खेचण्याचा प्रयत्न केला.



    तुमच्या जमावाने गुंडगिरी केली. त्यातून चौघांना आपले प्राण गमवावे लागलेत. पण दीदी त्याच दिवशी हिंसाचारात भाजपचे कार्यकर्ते आनंद बर्मन यांची गुंड़ांनी हत्या केली त्याबद्दल तुमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नाही आला…!! हे तुमचे राजकारण असेल, पण बंगालची ही राजकीय संस्कृती नाही, असेही अमित शहांनी सुनावले.

    अमित शहा पुढे म्हणाले, की ममतादीदी रोज माझा राजीनामा मागत असतात. जनता मागेल तेव्हा मी राजीनामा देईन. पण दीदी तुमच्या राजीनाम्याची वेळ जवळ आली आहे. २ मे रोजी तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. त्याला पर्याय नाही कारण बंगालच्या जनतेने तुमचा पराभव केलेला असेल.

    Earlier, Didi encouraged youngsters & women to come forward & gherao CAPF. You said & left on your wheelchair. But because of you, 4 people died there


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!