विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊस मधल्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या खडाजंगीचे पडसाद सगळ्या जगात उमटले. युरोपीय राष्ट्रप्रमुखांनी झेलेन्स्की यांना “हिरो” बनविले, तर अमेरिकन राज्यकर्त्यांनी त्यांना “व्हिलन” ठरविले. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्व विषयी आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी अचूक आणि परखड मत व्यक्त केले.
जयशंकर म्हणाले :
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन राष्ट्रवादी आहेत. गेल्या 70 80 वर्षांमध्ये अमेरिकेने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बाज सांभाळण्यासाठी प्रचंड खर्च केला तो खर्च अमेरिकेने स्वतःच्या हितासाठी करायला हवा होता असे ट्रम्प यांचे मत आहे तो त्यांच्या अमेरिकन राष्ट्रवादी आलेला विचार आहे. ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण “आऊट ऑफ सिलॅबस” आहे. कारण आत्तापर्यंतच्या अमेरिकन धोरणाच्या पेक्षा ते पूर्ण दिसते वेगळे आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळ्या देशांशी असलेले अमेरिकेचे संबंध हा विषय जास्त गुंतागुंतीचा आहे, पण भारत आणि अमेरिका यांचे संबंध उत्तम आणि दृढमूल आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीला मला बोलाविले होते. तिथे आमची उत्तम चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताविषयी नितांत आदर आहे. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध तर खूपच मधूर असल्याचे सगळ्या जगाने पाहिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी परराष्ट्र दौऱ्यावर जातात, त्यावेळी ते नेहमीच भारताच्या दौऱ्याची आठवण काढतात. भारतामध्ये त्यांचे झालेले स्वागत त्यांना मिळालेला आदर आणि सौहार्दपूर्ण वर्तणूक त्यांच्या पूर्ण लक्षात आहे. त्याविषयी ते नेहमी बोलून दाखवतात.
अमेरिका आणि भारत या दोन देशांच्या परराष्ट्र धोरणांचा विषय येतो, त्यावेळी काही बाबतीत मतभेद आहेत, पण ते चर्चेने सुटण्यासारखे आहेत, पण बऱ्याच विषयांवर दोन्ही देशांचे एकमत देखील आहे. भारताने देखील “आऊट ऑफ सिलॅबस” जाऊन आपले परराष्ट्र धोरण अंमलात आणले, तर बऱ्याच चांगल्या गोष्टी साध्य करता येतील.
EAM S Jaishankar take on Trump go viral after US Prez-Zelenskyy clash at Oval
महत्वाच्या बातम्या
- भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उद्भवली नवी NCP!!; पण कुणी, कशी आणि का काढली??
- व्हॉट्सअँप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- D K Shivakumar : महाकुंभच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल डी.के.शिवकुमार यांनी केले मुख्यमंत्री योगींचे कौतुक
- EPFO : EPFOने २०२४-२५ साठी PF ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवला कायम