• Download App
    कर्तव्य प्रथम, नंतर वैयक्तिक सुखाचा विचार; सुरतच्या दीक्षिता वाघानी यांचे प्रेरणादायी कार्य|Duty first then personal well-being; Inspirational work by Dixita Waghani of Surat of Gujrath

    कोरोना योद्धा: कर्तव्य प्रथम, नंतर वैयक्तिक सुखाचा विचार; सुरतच्या दीक्षिता वाघानी यांचे प्रेरणादायी कार्य

    विशेष प्रतिनिधी

    सुरत : गुजरात राज्यातील सुरत येथील दीक्षिता वाघानी यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची मोठी सेवा केली. गर्भवती असताना त्या चक्क रुग्णवाहिकेत कार्यरत होत्या.Duty first then personal well-being; Inspirational work by Dixita Waghani of Surat of Gujrath

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्या सात महिन्यांच्या बाळासह रुग्णांची सेवा करत आहेत. देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात कैद होते. पण, कुटुंबाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात त्या गुंतल्या आहेत. त्या समाजासाठी एक उदाहरण म्हणून उदयास आल्या आहेत.



    दीक्षिता वाघानी या सुरतमध्ये १०८ रुग्णवाहिकेत सेवेत आहेत. विशेष म्हणजे, त्या आणि त्यांचे पती कोरोना योद्ध्यांप्रमाणे उदयास आले आहेत.कोरोनाच्या युगात जे काही लोक आपले काम चांगले करत आहेत. त्यामध्ये हे दांपत्य सुरतमध्ये पूर्ण निष्ठेने काम करत आहेत. १०८ रुग्णवाहिकेत आपत्कालीन सेवेत दिवसा कोरोना रुग्णांना मदत करत असून त्यांचे पती रात्री रुग्णांची सेवा करतात.

    दीक्षिता वाघानी जेव्हा दिवसा रुग्णसेवा करतात. तेव्हा त्यांचे पती बाळाला सांभाळतात. रात्री दीक्षिता घरी परतात तेव्हा त्यांचे पती रुग्णसेवेसाठी रात्री कार्य करत आहेत.
    दिवसा त्यांचे पती मुलाची काळजी घेतात.

    जेव्हा जेव्हा मुलाला आईची गरज असते तेव्हा ते बाळाला आईकडे म्हणजे दिक्षिताकडे घेऊन जातात.त्या मुलाला खाऊ घालतात. तथापि, जेव्हा कर्तव्याचा प्रश्न येतो आणि जेव्हा त्या समाजकार्याला प्राधान्य देत आल्या आहेत.

    Duty first then personal well-being; Inspirational work by Dixita Waghani of Surat of Gujrath

    Related posts

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!