विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : Dutch female काश्मीरमधील जगप्रसिद्ध डल लेकच्या स्वच्छतेसाठी एक डच महिला पर्यटक एलिस हुबर्टिना स्पानडरमन (वय ६९) गेल्या पाच वर्षांपासून झटत आहेत. नेदरलँड्समधून आलेल्या या पर्यटकाने स्वखर्चाने, कोणतीही जाहिरात न करता आणि कोणताही मोबदला न घेता दररोज स्वतः बोट चालवत डल लेकमधील प्लास्टिक आणि इतर कचरा उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.Dutch female
या मोहिमेला एलिस यांनी ‘हॉलंडसे स्कूनमाक’ म्हणजेच ‘डच क्लीनिंग’ असं नाव दिलं आहे. त्यांच्या या कार्याने काश्मीरमधील स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक, बोटचालक आणि पर्यटकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली आहे. अनेक नागरिक आता स्वतःहून लेकमध्ये कचरा टाकण्याचं टाळत आहेत.Dutch female
एलिस सांगतात, “मी हॉलंडमध्ये समुद्रकिनारी राहत होते. तिथेही प्लास्टिकचा कचरा पाण्यात टाकत असत, तेव्हा मी तो उचलायला सुरुवात केली. कचरा पाहिल्यावर शांत बसणं माझ्या स्वभावात नाही.”
एलिस पहिल्यांदा २५ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये आल्या होत्या. त्या दाल लेकच्या सौंदर्याने भारावून गेल्या. मात्र जेव्हा त्या पाच वर्षांपूर्वी कायमस्वरूपी राहण्यासाठी परत आल्या, तेव्हा लेकमधील घाण, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि टाकाऊ वस्तू पाहून त्या व्यथित झाल्या.मी काश्मीरमध्ये पाय ठेवताच कचरा उचलायला सुरुवात केली आणि आज पाच वर्षं झाली,” असं त्या सांगतात.
नोव्हेंबर २०२४ मध्ये एलिस यांनी स्वतःची बोट विकत घेतली, कारण सार्वजनिक बोटींसाठी वेळ किंवा परवानगी मिळत नव्हती. त्या बोटीवर दररोज त्या एकट्याच बसून पाण्यातून प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्माकोलचे तुकडे आणि अन्नपदार्थांचे उरलेसुरले पदार्थ उचलतात
माझं काम समुद्रात एक थेंब असेल, पण उदाहरण ठेवलं की लोक पाहायला लागतात. आपल्यावर कोणी लक्ष ठेवतंय हे कळल्यावर लोक आपोआप जबाबदारीने वागू लागतात,” असं त्या सांगतात.सरकार आणि स्थानिक यंत्रणांनीही जलप्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाय करायला हवेत. डल लेक हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर काश्मीरच्या संस्कृतीचा आत्मा आहे.
एलिसचं हे कार्य केवळ स्वच्छतेपुरतं मर्यादित नाही. त्या लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत.
“आपल्याला निसर्गाकडून जे मिळालं आहे, त्याचं रक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असं त्या सांगतात.
सोशल मीडियावर एलिस यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून, अनेक पर्यटक आणि स्थानिक तरुण त्यांच्याबरोबर स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या कार्याची अधिकृत दखल अद्याप घेतलेली नाही.
Dutch female tourist Alice Spanderman takes responsibility for cleaning Dal Lake
महत्वाच्या बातम्या
- QUAD : दहशतवाद माजवणाऱ्यांना आणि दहशतवाद पीडितांना एकाच तागडीत तोलू नका; जयशंकर यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले
- Indore High Court : मध्यप्रदेशातील 75 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा होणार; इंदूर हायकोर्टाचा NTA ला आदेश
- Kolkata Law College : कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण : दोन दिवस आधीच रचला होता कट, आरोपींची योजना तपासात उघड
- Ravindra Chavan भाजपा हीच माझी ओळख म्हणणारे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी!!