• Download App
    पुढच्या कारसेवेच्या वेळी रामभक्तांवर आणि कृष्णभक्तांवर गोळ्या बरसणार नाहीत, तर पुष्पवर्षाव होईल!! |During the next car service, bullets will not rain on Ram devotees and Krishna devotees, but there will be showers of flowers

    पुढच्या कारसेवेच्या वेळी रामभक्तांवर आणि कृष्णभक्तांवर गोळ्या बरसणार नाहीत, तर पुष्पवर्षाव होईल!!

    वृत्तसंस्था

    अयोध्या : श्री राम लल्लांच्या अयोध्येत ऐतिहासिक दीपोत्सवात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. नऊ लाख दीपांनी अयोध्या उजळली जात आहे. या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेश संपूर्ण मंत्रिमंडळ श्री राम लल्लांच्या चरणी हजर आहे.During the next car service, bullets will not rain on Ram devotees and Krishna devotees, but there will be showers of flowers

    यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील कारसेवेच्या आठवणी जागविल्या. ते म्हणाले, की आजपासून 31 वर्षांपूर्वी 2 नोव्हेंबर 1990 रोजी अयोध्येमध्ये राम भक्तांवर गोळ्या चालविण्यात आल्या होत्या. लाठीमार करण्यात आला होता.



    पण उत्तर प्रदेशातल्या जनतेने लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली आणि ज्यांनी भक्तांवर गोळ्या चालविल्या ते जनतेच्या ताकदीपुढे आज झुकून उभे आहेत. जनतेने अशीच ताकद दाखविली तर पुढच्या कारसेवेच्या वेळी कारसेवकांवर गोळ्या चालविणाऱ्या परिवारातले लोक कार सेवेसाठी रांगेत उभे असलेले दिसतील.

    इथून पुढे जेव्हा कारसेवा होईल तेव्हा कारसेवकांवर गोळ्या चालविल्या जाणार नाही तर पुष्पवर्षाव केला जाईल, असे गौरवोद्गार योगी आदित्यनाथ यांनी काढले. या दीपोत्सवत अयोध्येत सर्व संत मंडळी जमली आहेत. आयोध्येत अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत आहे आणि त्याच वेळी पुढच्या कारसेवेसंदर्भात म्हणजे कृष्ण जन्मभूमीवरील कारसेवेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी घोषणा करून तिची जणू सुरुवातच करून दिली आहे.

    During the next car service, bullets will not rain on Ram devotees and Krishna devotees, but there will be showers of flowers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली